पोस्ट्स

फेब्रुवारी २५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन क्रांतीकारी विज्ञानप्रेमीला

इमेज
                    आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची  जर आपण यादी केली  तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या  गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम  निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?  याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .                     सावरकरांनी आपल्या प्राचीन वारसा लाभलेल्या हिंदू धर्मातील कालसुसंगत नसणाऱ्या  चालीरीतींना  तिलांजली देत त्यास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवले . त्यासाठी त्यांनी रत्नागिरीला सर्व जाती धर्माना प्रदेश असणारे पतित पावन मंदिरांची स्थापना केली , तसेच आपल्या धर्मांची प्रखर चिकित्सा करत त्यातील अनावश्यक प