पोस्ट्स

नोव्हेंबर १८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोष्ट्र एका ध्यासाची,,,प्रकाशवाटा

इमेज
लोकबिरादरी , हेमलकाशा   आज आपणास हे शद्ब खुपचं परिचयाचे झाले आहेत . अर्थात यामागे बाबा आमटे आणि त्याचे पुत्र प्रकाश आमटे आणि प्रकाश आमटे यांच्या सुविद्य पत्नी मंदाकिनी आमटे आणि त्यांना मदत करणारे असंख्य कार्यकर्त्यांचे परिश्रम खुप मोलाचे आहेत आपण कल्पना देखील करु शकणार नाही अस्या हाल अपेष्टा आणि संकटांना सामोरे जात , त्यांनी हे विश्व उभारले आहे . त्यांनी कोणत्या कष्टांना सामोरे जात हे यश मिळवले आहे हे आपणास माहिती करुन घेयचे असल्यास आपणास डॉ प्रकाश आमटे लिखित आणि समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित " प्रकाशवाटा " हा एक उत्तम पर्याय आहे . नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यामुळे मी नुकतेच सदर पुस्तक वाचले .         सुमारे दिडशे पानांच्या या पुस्तकात विविध अस्या १४प्रकारणातून त्यांनी हे विश्व कसे उभारले गेले ? याबाबत आपणास माहिती मिळते ‌ . हा प्रकल्प ज्यांच्यासाठी राबवायचा आहे . त्या आदिवासी ( वनवासी ) समाजबांधवांचा त्यांच्याकडे