पोस्ट्स

मे २९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान सरकार संभ्रवस्थेत !

इमेज
             पाकिस्तातील केंद्र  सरकार पुर्णतः संभ्रावस्थेत सापडल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे . नुकतेच सत्तेतून पायउतार झाल्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष झालेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांच्या मागणीपुढे मान तुकवत देशात सार्वत्रिक निवडणूक जाहीर करायचा तर् इम्रान खान यांनी संसद भंग केली असता सदर कृती घटनाबाह्य लोकशाहीची हत्या झाल्याचे नागरिकांना सांगत सत्ता घेतल्याचे समर्थन कसे करायचे तसेच जर राज्यशकट पुढे नेयचा तर देशापुढे माउंट एव्हरेस्ट(जगातील सर्वात उंच जागा ) , ते मारियाना गर्ता (जगातील सर्वात खोल जागा ) यातील अंतर सुद्धा कमी वाटावे  इतक्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या समस्या सोडवण्याचे  आव्हान . या    समस्येत तेथील केंद्र सरकार पूर्णतः फसले  असल्याचे दिसून येत आहे.            26 मे रोजी तेथील सरकारने पेट्रोलचे भाव तब्बल 30 रूपयांनी वाढवले.या सरकारच्या 40दिवसांच्या कार्यकाळात पाकिस्तानी रुपया डाँलरच्या तूलनेत 20रुपयांनी घसरला आहे. या सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर केलेल्या एका करारानुसार पाकिस्तानी सरकारला पेट्रोल अजुन 30 र