पोस्ट्स

फेब्रुवारी १७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी बघीतलेला बदलता ग्रामीण महाराष्ट्र

इमेज
      मनुष्याला अनुभवातून, प्रत्यक्ष बघून जे ज्ञान होते. ते शंभर पुस्तके वाचून होणाऱ्या ज्ञानापेक्षा कैकपटीने उत्तम असते, असे आपणाकडे म्हटले जाते.याचा अनुभव मी नूकताच 14 फेब्रुवारीरोजी केलेल्या नाशिक ठाणे प्रवासादरम्यान घेतला. तो आपणापर्यत पोहोचवून आपणास देखील त्यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी आजचे लेखन .     तर मित्रांनो, गेल्या रविवारी 14 फेब्रुवारी रोजी मी फिरण्याचा उद्द्येश्याने नाशिक -जव्हार - भिवंडी -ठाणे - इगतपूरी -नाशिक असा एसटीने चक्री मार्गाने प्रवास केला. या सबंध प्रवासात रस्ता छोटा असो अथवा मोठा असो तूरळक अपवाद वगळता सर्व रस्ते खड्डे विरहीत होते. अगदी मोखाडा, वाडा, या आदीवासी समजल्या जाणाऱ्या भागातील रस्तेसुद्धा खड्डेविरहीत होते. तसेच पुर्वी या भागातील ज्या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होत असे, त्या ठिकाणी जसे, भिवंडी शहर , कल्याण फाटा आदी सर्व ठिकाणी मुंबई महानगर विकास प्राधीकरण (MMRDA) च्या माध्यमातून उड्डाणपूल बांधून नागरीकांची वाहतूक कोंडीतून सुटका केली आहे. ज्यामुळे वाहतूक सुद्धा जलद झाली आहे. जलद वाहतूक झाल्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होत आहे, हे नाकारण्यात काही अर्थ नाही. ठा