पोस्ट्स

सप्टेंबर २७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानात मोठ्या राजकीय भुकंपाची शक्यता?

इमेज
      रविवार 25 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधान निवासातील संभाषण डार्क वेबवर उघड झाले ,ज्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. 8 जिबीच्या या आँडियो क्लिपमध्ये अनेक महत्तपुर्ण बाबी आहेत,  ज्यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी विविध शासकीय अधिकारी, राजकीय नेते,  दुसऱ्या देशाचे पंतप्रधान, राष्टपती, नातेवाईक, या नातेवाइकांचे नातेवाईक या सर्वांशी बोललेले रेकाँर्ड झाले आहे. या रेकाँर्डमध्ये पाकिस्तानी निवडणूक आयुक्तांना स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी देण्यात येणाऱ्या सुचना, स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी  भारताकडून आयात करण्याचा गोष्टींंबाबत केलेली चर्चा{ लोकांशी  बोलताना हेच पंतप्रधान काश्मीरचा प्रश्न सुटेपर्यंत भारताशी व्यापार अवघड असल्याचे सांगतात} ,पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना त्रास व्हावा यासाठी कोणकोणत्या खेळी करता येतील, मिडीयाला कसे मँनेज करायचे? देशात वादंग निर्माण करुन पेट्रोल आणि डिझेलचे भाव अजून कसे वाढवता येईल? याबाबत केलेली चर्चा यासारख्या चर्चा समाविष्ट आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या आँडियो क्लिपमधील आवाज स्वतः च्या असल्याचे मान्य केल्याने ,तसेच यात