पोस्ट्स

फेब्रुवारी ११, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्राच्या एसटीला पडलेला अजगराच्या विळखा

इमेज
                                    काल सायंकाळची गोष्ट आहे . सहजच युट्युबवर फेरफटका मारत होतो . त्या फेरफटका दरम्यान एक व्हिडिओ समोर आला . व्हिडीओच्या पार्श्वभुमीवर  परीवहन महामंडळाच्या बसेस दिसत  असल्याने उत्सुकतेपोटी व्हिडीओ बघीतला .आणि क्षणभर काय प्रतिक्रिया द्यावी, हे सुचेनाच. व्हिडीओमध्ये नाँर्थ वेस्ट कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनचा एका बसविषयी माहिती सांगण्यात आली होती . सदर बस निपाणी येथून सुटुन 500 किमीचा प्रवास करत महाराष्ट्राचा औरंगाबाद येथे जात होती . मित्रांनो तूम्हाला यात फारसे वावगे वाटणार नाही कदाचित .पण मित्रांनो सदर बस जे 500 किमीचा प्रवास करत होती , त्यातील महाराष्ट्राचा वाटा होता 485 किमीचा , तर कर्नाटकाचा वाटा होता फक्त 15 किमीचा .या बसचे वेगळेपण इथेच संपत नाही . सदर बसचा मार्ग देखील महाराष्ट्राचा प्रचंड अभ्यास करून काढला असल्याचे दिसत होते . महाराष्ट्रात कोल्हापूर येथे आल्यावर  नेहमीचा कोल्हापूर पुणे अहमदनगर अशा मार्ग न निवडता सातारा फलटण नीरा दौड अहमदनगर अशा महाराष्ट्राचा ग्रामीण भागातून जाणारा मार्ग त्यांनी निवडला होता . मी एकदा पुण्याचा स्वारगेट