पोस्ट्स

जानेवारी २३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अथांग मनाचा थांग घेणारे मनकल्लोळ

इमेज
    १७व्या शतकात समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्र्लोकात एखादे कार्य यशस्वी होण्यसासाठी मन करावे  प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या सारख्या  श्र्लोकाद्वारे  मनाचे  मानवी आयुष्यतील महत्व स्पष्ट केले आहेच  आहे सध्याच्या स्पर्धेच्या काळात याचे महत्व अधिकच वाढलेले आहे. त्यामुळे मन अप्रसन्न का होते ? मन अप्रसन्न झाले हे ओळ्खह्ण्याची लक्षणे कोणती ? हे सर्वांनां माहिती असणे अत्यावश्यक झाले आहे .त्यामुळे अनेक विषयावर अत्यंत सोप्या मराठी भाषेत माहितीपूर्ण लेखन करणारे अच्युत गोडबोले यांनी नीलांबरी जोशी  यांची सहलेखक म्हणून मदत घेऊन  मानसिक आजार या  संकल्पनेवर  लिहलेले मनकल्लोळ हे पुस्तक अत्यंत महत्व्वाचे ठरते.   या पुस्तकाच्या  पहिल्या भागाचे वाचन करण्याचे सौभाग्य मला सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या मदतीने मिळाले दोन भागात प्रकशित या पुस्तकाच्या पहिल्या भागात  विविध मानसोपचार पद्धती , विविध प्रकारचे मानसिक आजाराची माहिती ,आजारांवर आजार होण्यामागची कारणे ,त्यावर कोणत्या प्रकरचे उपचार करण्यात येतात ? मानसिक आजाराच्या वर्गीकरणात हा आजार कोणत्या उपप्रकारात अंतर्भूत करण्यात आला आहे  आजारावर   या आधी