पोस्ट्स

जून २६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हवामान बदलावर नको चर्चा , कृती हवी

इमेज
                  अखेर महाराष्ट्रात मान्सून आला . मात्र यंदा मान्सून कमी बसणार आहे , अशी  शक्यता    हवामान खात्यामार्फत वर्तवली जात असल्याने , समस्त बळीराजा  चिंतेत आहे . मात्र ही चिंता फक्त फक्त भारतातील शेतकऱ्यांचा प्रश्न नाहीये .युरोप खंडातील जनतादेखील प्रचंड उष्माने त्रस्त आहे .गेल्या कित्येक   वर्षातील    तापमानाची उच्चांकी  नोंद आज युरोपात  होत आहे . त्यामुळे तिथे अक्षरशः आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीय . तेथील सरकारने तेथील लोकांना जरासे हायसे वाटावे या उद्देश्याने तिथे कारंजे सुरु केले आहेत . तेथील ही परिस्थिती अजून काही दिवस सुरूच राहणार असल्याचे तेथील हवामान खात्याने जाहीर केली आहे . जेट स्ट्रीममुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे . भारतीय मान्सूनवर  प्रभाव टाकणाऱ्या १७ घटकांपैकी जेट स्ट्रीम हा महत्वाचा घटक आहे . हे आपणास माहिती असेलच . म्हणजेच मान्सून हा जागतिक हवामान संस्थेचा भाग आहे . त्यामुळे सध्या भारतात कमी पडणारा मान्सून हा सध्याचा हवामान बदलाचा भाग आहे .                         आतापर्यंत प्रत्येक वर्षी डिसेम्बर महिन्यात COP या परिषदेच्या अनेक फे