पोस्ट्स

नोव्हेंबर २४, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

का हवा रॉबिनहूड

इमेज
माझ्या कालच्या नाशिक महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांच्या विषयी पोस्टवर फेसबुकवर झालेल्या चर्चेला उत्तर देण्यासाठी ही पोस्ट आहे.कालच्या लेखाची  लिंक तुम्ही या लेखाच्या खाली बघू शकता . बहुतेक लोकांनी माझ्यावर मी राजकारणी लोकांची बाजू घेत असून प्रामाणिक पणाला तिलांजली देत असल्याचा आरोप केलाय . त्यांना मी सांगू इच्छितो की  मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही . त्यामुळे राजकारणी लोकांची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही . तर सपर्धापरीक्षेची  तयारी करणारा विद्यार्थी आहे. माझ्या फेसबुकवरील पोस्टचा सर्वसाधारण सुर मुंढेंच्या कडक शिस्तीला कंटाळून नगरसेवकांनी आणि अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केल्याने नाशिकचे भले करणारा अधिकारी नाशिक सोडून गेला त्यांना मी सांगू  इच्छितो की , ज्या प्रमाणे आत्मविश्वास (कॉन्फिडन्स ) आणि अति आत्मविश्वास९ओव्हर कॉन्फिडन्स ) यात फरक असतो त्याचा प्रमाणे कडकपणा आणि हेकेखोर पणा यात फरक असतो . मुंढेंचा कडकपणा हा अतिरेक होता आणि "अति सर्वत्र वर्जयत्ये "या संस्कृत सुभाषितांप्रमाणे तो त्याजच होता . माझ्या कालच्या लेखनावर दुसरा आक्षेप असा घेतला गेला की लोकप्रतिनि