पोस्ट्स

डिसेंबर २७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भविष्याचा वेध घेणारी ....... नॅशनल रेल पॉलिसी

इमेज
                              भारतीय रेल्वे ही प्रचंड संख्येने बदलत आहे ,  हे आपण जाणतातच . त्याच मालिकेत भविष्यात कोणकोणते बदल होणार आहे ?  याची झलक देणारी नॅशनल रेल पॉलिसीचा मसुदा  नुकतीच केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आला आहे . ज्यामध्ये पुढील  30 वर्षाचा आढावा घेऊन रेल्वमध्ये कोणकोणते बदल होणार आहेत . याची  रूपरेखा सांगण्यात आली आहे .   या मसुद्याचे  तीन  भागात विभाजन करण्यात आले आहे . जे  2024 पर्यंत करावयाची कामे,  2030 पर्यंत करावयाची कामे , आणि 2050 पर्यंत कामे असे विभाजन करण्यात आले आहे . केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मसुद्यामध्ये  2024  आणि 2030 पर्यंतचा कामाचा समावेश करण्यात आला आहे  यातील ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत  1).महामार्गाच्या बाबतीत ज्याप्रमाणे सुवर्णभूज चतुष्कोण तसेच पूर्व पश्चिम मार्ग आणि उत्तर दक्षिण कॉरिडॉर आहे , त्या धर्तीवर देशातील चार  प्रमुख महानगरे असणारे दिल्ली मुबई , चेन्नई कोलकात्ता एकमेकांशी किमान 160 किमी प्रति तास या वेगाने चालणाऱ्या रेल्वे गाड्यांचा माध्यमातून जोडणे .  2) देशातील मालवाहतुकीतील रेल्वेचा सध्याचा असणारा 27%  वाढवून 45% आणणे