पोस्ट्स

एप्रिल १९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचा दक्षिण अमेरिका खंडात वाढता डंका

इमेज
आपल्या भारताच्या जगभरात डंका सातत्याने वाढत आहे . जगभरातील कोणतेही क्षेत्र भारताच्या प्रभावापासून दूर राहिलेले नाहीये . पृथ्वीगोलाचा विचार करता भारताच्या पूर्णतः विरुद्ध असलेला दक्षिण अमेरिका खंड देखील त्यापासून सुटलेला नाहीये याच भागातील   गयाना ,   पनामा , कोलंबिया आणि डॉमिनिकन रिपब्लिक   या देशांना   आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर   परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून एप्रिलच्या शेवटच्या आटवड्यात   अधिकृत भेट देणार आहेत. या देशांना त्यांची ही पहिलीच भेट असेल.   गयानामध्ये,   21 ते 23   एप्रिल   या दरम्यान    परराष्ट्र व्यवहार मंत्री   अनेक मंत्र्यांशी संवाद साधणार आहे. ते त्यांचे समकक्ष यांच्यासमवेत संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्ष असतील. श्री ह्यू हिल्टन टॉड हे दोन्ही देशांमधील सर्व मुद्द्यांवर चर्चा करतील.    हा    गयाना दौरा भारतासाठी   कौन्सिल ऑन फॉरेन अँड कम्युनिटी रिलेशन्स (COFCOR);या   15 सदस्यीय कॅरिबियन   देशातील (CARICOM))   परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीची आणि सहभागी असलेल्या द्विपक्षीय बैठकांसाठी देखील एक संधी असेल.   त्या नंतरडॉ. एस   जयशंकर पनामा देशाला

स्मरण एका भारत बदलणाऱ्या घटनेचे

इमेज
                 आज बुधवार 19 एप्रिल 2023 आजच्याच दिवशी 48 वर्षापूर्वी म्हणजे 1976 एप्रिल 19 रोजी एक चमत्कार घडला होता. एक विकसनशील देशाने युनाटेड सेव्हीयत सोशालिस्ट रशिया या देशाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह आकाशात यशस्वी प्रक्षेपित केला होता. तो विकसनशील देश होता भारत. आणि त्या उपग्रहाचे नाव.होते आर्यभट्ट . आज भारत जगभरातील अनेकांचे उपग्रह स्वतःच्या प्रक्षेपण यानातून प्रक्षेपीत करतो, भारताचे सुद्धा कित्येक उपग्रह आज अंतराळात भ्रमण करत आहेत. या सर्वाची मुहुर्तमेढ या गोष्टीने रोवली गेली होती. या ऐताहासिक घटनेच्या 48व्या वर्धापनदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा .                            मित्रांनो, त्यावेळी भारतात प्रचंड प्रमाणात भुकबळी जात होते. गरीबांची संख्या देखील प्रचंड होती. देशातील दूधाचे उत्पादन नगण्य होते. मासेमारीत देश जगाचा विचार करता प्रचंड मागे होता. अस्यावेळी काळाची पाउले ओळखून उचललेल्या पाउल किती गरजेचे आहे. हे आपण जाणतातच.                  आज आपण टिव्हीवर विविध वाहिन्या बघतो, तसेच हवामानाचा अंदाज व्यक्त करतो.  इग्नू वाय.सी.एम. ओ.यू. सारख्या विद्यापीठांतून खे