पोस्ट्स

मे ८, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जाने वो कैसे लोग थे

इमेज
काल सहज मिञांबरोबर चँटींग करत असताना आयुष्याचा विचार निघाला आमच्यापैकी एका मिञाने सांगितले की आयुष्य म्हणजे काय हे समजायचे असेल तर गुरुदत् तचे चिञपट बघितले पाहिजे  आणी ते खरही आहेच ना ? प्यासा मधील कवी विजय असो ज्याला त्याचा स्ट्रगलच्या कालावधीत प्रचंड हालअपेष्टा अपमान सहन करावा लागतो माञ तेच जग त्याला प्रसिध्दी मिळाल्यावर कशे बदलते त्याला आम्ही मदत कशी केली हे त्याचे भाऊ कशे सांगतात जे तद्दन खोटे असते किंवा फिल्मी दुनियाची भीषणता सांगणारी कागज के फूल हा चिञपट असो त्यांचे सर्वच चिञपट एकाहून एक जीव ओवाळून टाकणारे होते मला तर असे वाटते की गुरुदत्तांचे झोपेच्या गोळ्या व दारु यांच्या एकञित सेवनाने निधन झाले नसते तर भारताने आतापर्यत ४/५ आँस्कर नक्कीच प्राप्त केले असते अत्यत हळव्या मनाचा स्रूजनशील निर्माता दिग्दर्शक अभिनेता आपण गमवला तो अत्यंत तरुण पणी म्हणजे जेमतेम 39वर्षाचा असताना गेला त्यांचा एका सहकार्याने 10 years with Gurudatt नावाचे त्यांचा आठवणीचे पुस्तक लिहले आहे त्याचा त्या 10वर्षातील गुरुदत्त या नावाने अनुवाद झाला आहे मला नाशकात दोन्ही पुस्तके खुप शोधूनही सापडली