पोस्ट्स

सप्टेंबर १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब....... बुद्धिबळाचा (भाग 5)

इमेज
             बुद्धिबळ ओलम्पियाडमधील भारताची घोडदौड वेगाने अंतिम ध्येयाकडे अर्थात सुवर्णपदाकडे सुरु आहे याचेच प्रत्यंतर सोमवारी 13 सप्टेंबर रोजी झालेल्या  उपांत्यपूर्व  सामना दरम्यान दिसले . उपांत्यपूर्व  फेरीत ब्लीट्स या प्रकारात ट्रायब्रेकमध्ये 5 विरुद्ध 1 असे सरळ यश  मिळवत दिमाखदारपणे  उपांत्य फेरीत प्रवेश केला .;        भारताचे  कप्तान  विशवनाथ आनंद यांच्या अनुपस्थित पहिल्या क्रमांकावर खेळताना नाशिकचे आयकॉन  गुजराथी आणि कोनेरू हंपी यांनी प्रतिस्पर्ध्यांविरोधात  बरोबरी साधली त्यांनी अनुक्रमे  veteran Vasyl Ivanchuk.  आणि    Iulija Osmak यांच्या विरोधात लढत दिली ब्लीट्स या प्रकारात ट्रायब्रेकमध्ये खेळताना अधिबान  यांनी प्रतिस्पर्ध्याला  Larsen Indian variation  या सापळ्यात अडकवून 36 चालीत नमवले .त्यांनी  Kirill Shevchenko  ला गुडघे टेकायला भाग पाडले . ब्लिटीझ खेळाच्या आधी झालेल्या दोन डावांमध्ये मात्र आपल्याला युक्रेनच्या खेळाडूंनी कडवी झुंज दिली या डावामध्ये पी हरिकृष्ण यांनी प्रतिस्पर्ध्यांविरोधात बरोबरी साधली मात्र नाशिकचे आयकॉन विदित गुजराथी याना मात्र पराभव बघावा लागला . भारताने

मुद्दे त्यांचे .... मुद्दे आपले

इमेज
          मी आपणाशी बोलत असताना (13 सप्टेंबर ) युरोप खंडातील जर्मनी आणि उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा या देशात सार्वत्रिक निवडणुकीमुळे समाजजीवन अक्षरशः ढवळून निघत आहे .जर्मनीमध्ये 26  सप्टेंबर आणि कॅनडामध्ये 20 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत या निमित्याने तेथील राजकीय प्रचारात दंग आहेत . विरोधकांवर विविध मुद्यांवर टीका करत आहे मात्र हे करताना वैयक्तिक हेवे दाव्यांवर ते बोलताना दिसत नाहीये. विविध प्रसंगी त्यांनी त्यांनी घेतलेल्या भुमिकांवर ते टिका करत आहेत. ज्यामध्ये स्त्रीवाद, दहशतवाद, हवामान बदल या मुद्यांचा समावेश आहे. तेथील राजकीय पक्षांनी आपापले जाहिरनामे देखील प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये हवामान बदलाचा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात अग्रभागी आहे.हवामान बदलाचा  जगात सर्वाधिक फटका आपणास बसलेला आहे, मात्र आपल्या येथील निवडणूकांमध्ये या मुद्द्याचा दुर दूरपर्यत समावेश नसतो,  हे आपण जाणतातच.               मी गेला आठवडाभर  DW , France24 आदी वृत्त वाहिन्यांचा या संदर्भातील बातम्या बघत आहे. या बातम्यांमध्ये काही चर्चांचा देखील समावेश आहे. या सर्व चर्चांमध्ये एकमेकांचे बोलणे