पोस्ट्स

मे ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचा अश्व वेगाने दौडताना

इमेज
             येणारे शतक भारताचे असेल असे विधान मागील शतकाच्या शेवटी अनेक मोठ्या धुरिणींनी केले होते चालू शतकाच्या साधारणतः एक चतुर्थांश भाग सरत असताना या विधानाचा अनुभव येत आहे . मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनी , डेन्मार्क , आणि फ्रांस या देशात केलेले दौरे त्याचीच साक्ष देत आहेत .  रशिया आणि युक्रेन युद्धाच्यावेळी स्वहिताचा बळी न देता या युद्धापासून अलिप्तता  राखत पश्चिम युरोपीय देशांना पूर्णतः अनुकूल भूमिका ना घेता आपली स्वतःची वेगळी ठाम भूमिका  घेण्याचा पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे .        फ्रान्समध्ये गेल्याच आठवड्यात २४ एप्रिल रोजी अध्यक्षपदाची निवडणूक झाली ज्यामध्ये  इमॅन्युएल मॅक्रॉन हे सलग  दुसऱ्यांदा  अध्यक्षपदासाठी निवडून आले पुढल्या पंधरवड्यात तेथील केंद्रीय विधिमंडळाच्या (आपल्या लोकसभा समकक्ष ) निवडणुका आहेत फ्रांस मधील आता पर्यंतच्या कल बघता अध्यक्ष ज्या पक्षाचा तोच पक्ष केंद्रीय विधिमंडळात अधिक जागा मिळवतो . फ्रान्समधील या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद मोदी यांची फ्रान्सची भेट मोठी महत्त्वाची आहे .फ्रान्स

हमिद दलवाई तूमच्या कार्याला शतशः नमन

इमेज
 ३ मे १९७७ ही फक्त तारीख नाहीये . आज ४५ वर्षांनंतर सुद्धा अत्यंत कट्टर , रुढीग्रस्त , पंरपरेच्या जोखड्यात अडकलेल्या एका समाजातील एका समाजसुधारकांच्या मृत्यूची तारीख आहे ही , त्या महान समाज सुधारकांचे नाव आहे हमीद दलवाई . कोकणात जन्मलेल्या या समाजसुधारकाने आपल्या उणापुरया ४४ वर्षाच्या आयुष्यात हिमालयापेक्षा मोठे कार्य केले . ते सुद्धा आज २०२२ साली सुद्धा अत्यंत रुढीग्रस्त असणाऱ्या समाजात .आज तो समाज घटक इतका रुढीग्रस्त असेल तर ४५ वर्षांपूर्वी किती रूढिग्रत असेल याची कल्पनाच केलेली बरी  . हमीद दलवाई ज्या  समाज घटकाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाज घटकात   अत्यंत मोजके शब्दशः हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच समाज सुधारक झाले त्यातील एक महत्तवाचे नाव म्हणजे हमीद दलवाई . त्यामुळे त्यांचे कार्य अत्यंत महत्तवाचे ठरते  हमीद दलवाई यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश राजवटीत त्या वेळच्या बॉम्बे राज्यात  (आताचा महाराष्ट्र) मिरजोली गावात मराठी भाषिक मुस्लिम कुटुंबात झाला.  त्यांनी माध्यमिक शिक्षण चिपळूण येथे घेतले. 1951 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील इस्माईल युसूफ कॉलेज आणि रुपारेल