पोस्ट्स

जानेवारी ३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

६ महिने झाले राष्ट्रीय महामार्ग बंद

इमेज
      १२ जुलै २०२२ ही फक्त एक  तारीख नाहीये . आपल्या महाराष्ट्रातील एक राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याची ती तारीख आहे आज या घटनेला ६ महिने होत आले आहेत मात्र अद्याप हा महामार्ग बंदच आहे . नाशिकहून दिंडोरी सापुतारा मार्गे सुरतला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८  हाच तो राष्ट्रीय महामार्ग . सापुताऱ्याजवळ असणाऱ्या घाटात दरड कोसळून हा महामार्ग बंद झाला . महामार्ग बंद झाल्यावर त्या दिवशी माध्यमामध्ये याविषयी बातम्या आल्या त्यानंतर मात्र प्रस्थापित माध्यमांना बातमीविषयी अनेक महत्वाचे विषय असल्याने या विषयी त्यांनी मौनच बाळगले . फक्त दहा किलोमीटरसाठी ग्रामस्थांना मारावा लागतोय सत्तर किमीचा फेरा या सारख्या सनसनाटी मथळ्याचा बातम्याही त्यांनी दिल्या नाहीत . न जाणो या भागातील लोकांनीही आम्हाला गुजरातमध्ये जायचे आहे अशी मागणी केली तर काय करायचे ? त्यापेक्षा त्याचा संपर्क ठेवणारा राष्ट्रीय महामार्ग बंद असलेलाच बरा असा उदात्त विचार त्या मागे असेल कदाचित     मात्र हा राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने नाशिकहून सुरतला जायला दिंडोरी सापुतारा वाजदा यामार्गे जाता येत नाहीये . तर नाशिकहुन सुरतला जाण्यासा