पोस्ट्स

सप्टेंबर १४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कँनडाची सुत्रे भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे?

इमेज
                   आज हे लिहीत असताना (14 सप्टेंबर सायंकाळ) रोजी कँनडातील केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूकीच्या प्रचार आंतीम टप्यात आला आहे. येत्या सोमवारी अर्थात 20 सप्टेंबर रोजी कँनडातील नागरीक तेथील खासदार निवडण्यासाठी मतदान करतील. आपले अल्पमतातील सरकारला पुर्ण बहुमत मिळण्यासाठी, कोरोनाचा चौथ्या लाटेचा धोका कायम असताना तसेच विद्यमान सरकारचे 17महिने बाकी असताना कँनडाच्या पंतप्रधानांनी तेथील संसद भंग करत मुदतपुर्व निवडणूका जाहिर केल्या. ज्यासाठी येत्या 20 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.कोरोना साथीच्या काळात तेथील विरोधक सरकारला पुर्ण समर्थन देत असताना, या निवडणूका जाहिर करण्यात आल्या आहेत, हे विशेष. या निवडणूकीत ज्या पक्षाला अधिक मते मिळतील , त्या पक्षाचा कँनडाचा पंतप्रधान होईल. ग्लोबल न्युज , आणि सि एन एन या वृत्तवाहिनीच्या   (आपल्या प्रकारे अजेंडा सेटर वृत्तवाहिन्या या आहेत का ?, ते माहिती नाही) बातम्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे जे एक्सिट पोल समोर येत आहे ,त्यानुसार  न्यु डेमोक्रेटीक पक्षाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार  जगमीतसिंग यांची लोकप्रियता प्रचंड वाढतेय. या वृत्तवहिनीवर पक्षाच

पर्यावरण रक्षणासाठीचा एक वेडा.... ब्रिजेश शर्मा

इमेज
अनेकदा ध्येयवेड्या लोकांना लोकांना आपाल्याकडे वेडे समजले जाते.  कुठून या व्यक्तीच्या मनात हे खूळ शिरले कोणास ठाऊक ? असा सर्वसाधारण नजरेतून त्यांच्याकडे बघितले जाते . मात्र यावेळी इतिहास्यात अश्याच काहीश्या वेडगळ  वाटणाऱ्या व्यक्तीमुळे फार मोठी सर्वसाधारण स्थितीत अशक्यप्राय वाटणारी कामे  झाल्याचा सोईस्करपणे विसर पडतो . रस्त्यावरून जाताना एका मुरलीधर आमटे  यांनी कुष्ठरोग्याला पहिले,  त्याच्या स्थितीची त्यांना  दया आली, त्यांची स्थिती  सुधारावी, या वेडाने ध्येयाने त्यांना झपाटले आणि त्यातून बाबा आमटे या महान समाजसुधारकांचा आणि हेमलकसा या एका स्वप्नवत वाटणाऱ्या प्रकल्पाचा जन्म झाला अन्यवेळी समाजाचा तिरस्काराचा धनी झालेल्या कुष्ठारोग्यांचा अंगभूत असणाऱ्या कलागुणांना वाव मिळून त्यांना अर्थजनासाठी साधन मिळाले       गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये असा एक ध्येयवेडा आला आहे, ब्रजेश शर्मा हे त्यांचे नाव. MBA,सारखे उच्च शिक्षण घेतल्यावर युरोपातील अर्मेनिया आणि जार्जिया आदी पाश्चात्य देशातील सुखवस्त नोकरी सोडुन,  सेंद्रिय  शेतीच्या  उप्तादनाचा  आणि पर्यवर्णपूरक  जीवनशैलीचा लोकांनी स्वीकार करावा ,