पोस्ट्स

मार्च ३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोल्हापूर,सोलापूर दोन टोके

इमेज
          काही महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. मी सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये  गेलो होतो. सोलापूर आणि कोल्हापूर हे महाराष्ट्रातील कर्नाटकला लागून असणारे जिल्हे आहेत. कर्नाटकमधील मुंबई कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर हे जिल्हे सिमा शेअर करतात. सोलापूर जिल्हा कर्नाटकच्या मुंबई कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर हैद्राबाद कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर सीमा शेअर करतो. मी दोही शहरांमध्ये प्रत्येकी तीन चार दिवस मुक्काम केला. या दरम्यान मला जाणवलेले घटक आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन                 कोल्हापूरपासून कागलच्या दिशेने25 किमी गेल्यावर कर्नाटक राज्य सुरु होते. मात्र कोल्हापूरमध्ये सर्वत्र मराठीचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. नाशिक किंवा पुण्यात फिरतोय असा भास व्हावा इतके मराठीमय वातावरण या ठिकाणी जाणवते.मी भूगोलाच्या मानवी भूगोल या शाखेचा विद्यार्थी आहे.  त्यावेळी अभ्यासताना मिळालेल्या ज्ञानानुसार सांगतोय. कोणत्याही प्रकारचा मानवी समुह हा बटण दाबल्यावर ज्याप्रकारे लाइट लागतो, अथवा बंद होतो, त्याप्रकारे एखादा विभाग संपला म्हणून व्यक्तीसमुह दिसायचा थांबत नाही. व्यक्तीसमुहातील बदल हे हळूहळ