पोस्ट्स

जून ५, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्याने

इमेज
                            आज ६ जून अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस . त्या निमित्याने आज इतक्या वर्षांनी जेव्हा आपण त्यांचा राज्याभिषेकाच्या घटनेकडे  बघतो तेव्हा चटकन लक्षात येते , की त्यांनी राज्य कारभाराची भाषा ही मराठी अर्थात सर्वसामान्य जनतेची भाषा केली . आज आपण स्वतंत्र होऊन ७२ वर्षे होत आली आहेत,  मात्र आपण अजून आपला कारभार भारतातील प्रादेशिक भाषेत आणू शकलेलो नाही . आजही आपला बहुतांशी कारभार हा इंग्रजीत चालतो . हे इंग्रजीचे भूत आपल्या मानगुटीवरून इतक्या  वर्षांनी देखील उतरलेले नाही . ते जेव्हा उतरेल तोच खरा अर्थाने सुराज्य दिन म्हणायला हरकत नसावी .                   छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार मराठीत आणतांना खास राज्य व्यवहार कोष तयार केला . त्यावेळच्या राज्यकारभाराची प्रमुख भाषा असलेल्या फारशी भाषेतील शब्दांना अनेक मराठी शब्द दिले जे सहजतेने मराठीत स्वीकारले गेले . आजही नाही म्हणायला  आपल्या राज्य सरकारचा कारभार मराठीत चालतो मात्र ते मराठी फारच त्रासदायक असते , जे सहजतेने अंगवळणी पडत नाही , आणि दुर्दैवाने राज्य सरकारही त्याचा प्रसारासाठी

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्याने

इमेज
              सध्याचा काळातील मानव समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल / तर विषम हवामान आणि उन्हाळ्याच्या दिवसात तापमानाचा उच्चांक प्रस्थापित होण्याचे दिवस तापमानाचे सध्या नवनवीन उच्चांक स्थापित होत आहे . या धावक्याकडे मानवाचे लक्ष वेधले जावे यासाठी दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरणदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे . १९८० पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे . सध्याचा विज्ञानाला ज्ञात अशी एकमेव सजीवसृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून या सजीव सृष्टीतील एका प्रगत जातीने उचललेले पाऊल म्हणजे हा दिवस .              गेल्या काही वर्षांपासून या दिवशी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातोय . झाडाचे नैसर्गिक चक्रातले महत्त्वाचे स्थान यामुळे अधोरेखित होतंय . झाडाचे महत्व आपल्याकडे संत वाड्यमयात सुद्धा सांगण्यात आलंय . त्यामुळे जे आपणाकडे होते , त्याला दृढ मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहता येऊ शकते .        आज बदलते हवामान  हा भारतापुढेच नव्हे , तर समस्त मानवाजातीपुढील हा सर्वात मोठा प्रश्न आहे . आजपर्यंत मानव जामीन जुमला , गुलाम , साम्राजासाठी , जाती वंश आदी मुद्यावरून आ