पोस्ट्स

मे ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खगोलशास्त्रारातील हे रंजक शोध आपणास माहिती आहे ना ?

इमेज
          आपल्या सभोवताली पसरलेल्या अथांग पसरलेल्या अवकाशाविषयी आपल्यापैकी अनेकांना कुतुहूल असते . रात्री गावाबाहेर असताना ठळकपणे  दिसणाऱ्या  तारकासमूह मी तारे , ग्रह , उपग्रह , धूमकेतू , उल्का यांचे निरीक्षण करायला आपल्यापैकी अनेकांना आवडत सुद्धा असेल या सर्व गोष्टींच्या शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास खगोलशास्त्र म्हणतात हेही आपणस माहिती असेल तर .सध्याच्या महाराष्ट्रातील  राजकीय बातम्यांच्या गदारोळात या खगोलशात्रातील दोन महत्त्वाच्या ठरू शकतील अश्या दोन गोष्टींच्या शोधाच्या बातम्या काहिस्या हरवल्या माझे आजचे लेखन त्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी .           तर मित्रानो , विश्वाचा विस्तार होत आहे, हे ज्ञात सत्य आहे. बिग बँग थिअरी  नुसार, विश्वाची उत्पत्ती एका अकल्पनीय मोठ्या महास्फोटात झाली आणि  स्फोटाच्यावेळी बिंदुवत असणारे वस्तुमान एका बिंदूपासून बाहेर फेकले गेले या फेकले गेल्यामुळे  विश्वाचा विस्तार होत आहे . मागील 13.8 अब्जावर्षापासून हा विस्तार होतच आहे त्यातही गंमत अशी कि या विस्ताराची गट कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे शास्त्रज्ञांचे आतापर्यंतचे निरीक्षण होते  या