पोस्ट्स

ऑगस्ट २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लाल चिखल !

इमेज
     मला शाळेत असताना मराठी या विषयामध्ये एक धडा होता, "लाल चिखल!"  या धड्यातील नायकाच्या वडीलांनी बाजारात विकण्यासाठी टँमोटो आणले असतात. त्यावेळी बाजारात अनेकांनी टामँटो आणलेले असल्याने टामँटोचे भाव पडतात. पडलेल्या भावामध्ये टामँटो विकण्यासाठी नायकाचे वडील तयार नसल्याने बाजार संपण्याची वेळ येते तरी त्यांचे काहीच टामँटो विकले जात नाही. परीणामी अत्यंत निराश होवून नायकांचे वडील ते पायदळी तूडवतात. त्याचा अक्षरशः चिखल करतात. टामँटोचा रंगामुळे त्याचा रंग असतो, अक्षरशः रक्ताचे पाणी करुन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे यथोचित मुल्य न मिळाल्यामुळे होणारी मनोवस्था यात मांडण्यात आली होती. शाळेतील या धड्याचा उल्लेख करण्याचे कारण गेल्या आठवड्याभरात नाशिक जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टामँटो या पिकाला मिळालेला अत्यल्प भाव .         गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन बाजार समितीत शेतकऱ्यांना टामँटो पिकासाठी  किलोला 2 ते 3 रूपये भाव  मिळाला आहे. नाशिकच्या टामँटोसाठी हक्काची बाजारपेठ असणाऱ्या पाकिस्तानशी व्यापार बंद असणे, देशांतर्गत फारशी मागणी नसणेआणि  झ