पोस्ट्स

ऑगस्ट २७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग 10)

इमेज
               एखाद्याची अपयशाची मालिका झाली की ,  त्याच्या कडून स्वतःच्या अपयशाला साह्य होईल अश्या कृती नकळतपणे घडतात आणि त्याची अपयशाची मालिका अधिक वेगाने घडायला लागतात असे आपल्याकडे म्हणतात सध्या अमेरिकी प्रशासन याच अनुभवातून जात आहे . अमेरिका अफगाणिस्तानमधून पूर्णतः जाण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे त्या प्रमाणात अमेरिकेचे हे अपयश अजूनच ठळक होत चालले आहे . ज्याची अप्रत्यक्ष कबुली अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर इस्लमिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेचा  आंतराष्ट्रीय विभाग म्हणून ओळखला जाऊ शकेल अशा गट म्हणजेच  खुरासन प्रॉव्हिन्स या गटाने  हल्ला केल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत केली . या पत्रकार परिषदेत त्यांची देहबोली हि पराभूत मानसिकता दाखवणारी होती .काबुल आतंरराष्ट्रीय विमानतळ ज्याला तालिबानच्या पहिल्या पाडावानंतर अफगाणिस्तानचे पहिले लोकनियुक्त राष्ट्रपती हमीद करझाई यांचे नाव देण्यात आले आहे . त्या विमानतळाच्या दरवाजवळ  आणि विमानतळाच्या जवळच असणाऱ्या हॊटेलच्या दरवाजवळ असे दोन बॉम्बस्फोट 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी झाले ज्यामध्ये अमेरिकी लष्कराच