पोस्ट्स

मे १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीमधील यस्टी

इमेज
     सध्या माध्यमांतून कोरोना आणि ताक्तो चक्रिवादळाविषयी बातम्यांचा महापूर आलेला असताना  एक वेगळी बातमी माध्यमांत चमकून गेल्याचे मला दिसले या बातमीविषयी अन्य बातम्यांचा कोलाहलात फारसे काही बोलले गेले नाही. या बातमीचा परीणाम आपल्या सर्वांचा आयुष्यावर होणार आहे. त्यामुळे त्या विषयी आपणास सांगण्यासाठी आजचे लेखन. तर मित्रांनो आपली महाराष्ट्राची एसटी जी लवकरच 73 वर्षे पुर्ण करुन 74 व्या वर्षात पदार्पण करणार आहे, तीच्या मार्फत 500 साध्या गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. यापुर्वी शिवशाही, शिवनेरी सारख्या आरामदायी गाड्या आपल्या एसटीने भाड्याने घेतल्या आहेत. मात्र ढासळत्या आर्थिक डोलाऱ्यास सावरण्यासाठी आता साध्या गाड्या भाड्याने घेण्याची वेळ महामंडळावर आली आहे. प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या गाड्यांमधून सेवा देता यावी यासाठी यासाठी या गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहे. एकेकाळी आपल्या कार्यशाळेद्वारे भारतातील सर्वाधिक बस निर्मित करणाऱ्या आपल्या महामंडळावर बस स्वतः निर्मित करुन घेण्याऐवजी भाड्याने घेवून चालवण्याची वेळ आली आहे. यावेळी 700 बसेस स्वतः  एसटी आपल्या कार्यशाळेत तयार करणार आहे, हीच