पोस्ट्स

ऑक्टोबर २९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जो बायडन यांच्या पुढील मार्ग सुकर की अवघड ?

इमेज
       अमेरिकी अध्यक्ष जो बायडन यांच्या पुढील  २ वर्षाचा मार्ग हा सुकर असेल कि अवघड ? याचा निर्णयाची वेळ जवळ आली आहे कारण येत्या ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत मिड टर्म इलेक्शन होणार आहे .ज्यादारे  अमेरिकन संसदेच्या अर्थात काँग्रेसच्या आपल्या लोकसभा समकक्ष हाऊस ऑफ रेपेझेंटिव्ह च्या सर्वांच्या सर्व ४३५ जागांसाठी आणि आपल्या राज्यसभा समकक्ष सिनेटच्या ३५ जागांसाठी तसेच ३९  स्टेट आणि टेरेटरीच्या गव्हनरच्या निवडीसाठी मतदान होईल . अमेरिकेत ५० राज्य आणि अमेरिकेच्या स्वर्वभौत्मवाच्या अंतर्गत जगभरात  ५ टेरेटरी आहेत अमेरिकन संविधानानुसार या टेरेटरीस राज्याचा दर्जा नाहीये एक स्वतंत्र्य प्रणालीद्वारे त्यांच्या कारभार बघितला जातो तर अश्या एकूण ५५ गव्हांरपैकी ३९ गव्हर्नरनाची निवड करण्यासाठी अमेरिकन नागरिक ८ नोव्हेंबर रोजी मतदान करतील           अमेरिकेत अध्यक्षीय शासनव्यस्था आहे ज्यानुसार   अमेरिकन अध्यक्ष आणि तेथील विधिमंडळ या पूर्णतः स्वतंत्र मात्र एकमेकांशिवाय कार्य करू न शकणाऱ्या बाबी आहेत . अमेरिकेत दर ४ वर्षांनी अध्यक्षाची निवड होते   अध्यक्षांची मुदत दोन वर्ष पूर्ण