पोस्ट्स

सप्टेंबर १३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराची उडी

इमेज
           गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या पाकिस्तानच्या राजकारणाच्या सत्तानाट्यात  आतापर्यंत तटस्थतेची भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानी लष्कराची उडी  झाली आहे . पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखपदी नेमणूक करण्याच्या अधिकार विद्यमान सरकारला नाही अशा मुद्दा पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे नेते माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या राजकीय सभेत उपस्थित केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचा  या सत्तानाट्यात प्रवेश झाला  विद्यमान पाकिस्तानी सरकार हे गैर मार्गाने सत्तेत आले आहेत विद्यमान सरकारमधील पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आरोप सिद्ध झाले आहेतत्याना न्ययालयाने शिक्षा देखील सुनावली आहे  हे मंत्री जामिनावर बाहेर आहेत त्यामुळे त्यांच्याकडून गुणवत्तेच्या आधारे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची नेमणूक होऊ शकणार नाही . हे मंत्री गुणवत्तेला फाटा देत त्यांना अनुकूल भूमिका घेणाऱ्या व्यक्तीची पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणून नेमणूक करतील .पाकिस्तानच्या प्रशासनात लष्करप्रमुखांचे स्थान बघता त्या व्यक्तीवर सुयोग्य व्यक्तीचीच नेमणूक झाली पाहिजे विद्यमान सरकारनसध्याच्या लष्कर प्रमुखांना तात्पुरती

गुजरातमध्ये अवतरल्या पर्यावरण पूरक एसटीबसेस

इमेज
    मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या कवितेतील एक प्रसिद्ध वाक्य आहे, "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे".सध्या महाराष्ट्र एसटी सोडून अन्य राज्यातील एसटीने या वाक्यांमध्ये सांगितलेल्या बाबी सत्यात आणल्याचे दिसत आहे. एकेकाळी महाराष्ट्र एसटीची नक्कल इतर राज्यातील करायच्या एका अर्थाने महाराष्ट्र एसटी इतर राज्यांना विविध संकल्पना पुरवायची ,ज्याची नक्कल इतर राज्यातील एसटी महामंडळाकडून करण्यात येत असे.मात्र कालांतराने वर सांगितलेल्या वाक्यातील पुढच्या अर्धा भाग देखील महाराष्ट्र एसटी सोडून अन्य एसटीने प्रत्यक्षात आणला आहे. आज महाराष्ट्र एसटी देशाला नविन संकल्पना देत नाहीये , तर एकेकाळी महाराष्ट्र एसटीची संकल्पनेची नक्कल करणाऱ्या तेलंगणा, गुजरात राज्याच्या एसटी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत आहे. आज सप्टेंबर 2022 मध्ये गुजरातमध्ये जून्या एसटी बसेसच्या इंजिनाचे रूपांतर अत्यंत पर्यावरणपूरक असलेल्या  बिएस 6 इंजिनामध्ये करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. गुजरात एसटीच्या सोशल मिडीया अकाउंटवर गेल्यास आज इतक्या जून्या एसटी बसेच्या इंजिन