पोस्ट्स

जुलै २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिकच्या आदिवासी भागातील दुर्लक्षित गड वाघेरे

इमेज
       आपल्या महाराष्ट्राला डोंगरी किल्यांची मोठी परंपरा आहे  अनेक डोंगरी किल्ले सह्याद्रीच्या कुशीत आहे .काही किल्ले त्याच्यावर मोठ्या घडामोडी झाल्याने विशेष प्रसिद्ध आहेत जसे नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेला रामशेज किल्ला . जो त्यावर झालेल्या युद्धासाठी विशेष प्रसिद्ध आहेत  तर काही डोंगरी किल्ले काहीसे दुर्लक्षित आहेत .अशाच नाशिकपासून जवळच असलेला मात्र फारशा प्रसिद्ध किल्ला म्हणजे वाघरे किल्ला . मी जुलै महिन्यातील अखेरच्या रविवारी या किल्ल्याला  नाशिकमधील वाहतूक सुरक्षा, सह्याद्री बचाव आदी विविध सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणाऱ्या गरुडझेपेच्या दुर्गप्रेमींच्या सहकार्याने भेट दिली . पावसाच्या साथीने झालेल्या या दुर्गस्वारीचा अनुभव मनप्रसन्न करणारा होता .      नाशिकमधील आदिवासी भागातील त्रंबकेश्वर पेठ तालुक्याचा सीमेवरील मात्र प्रशासनाच्या दृष्टीने त्रंबकेश्वर तालुक्यतात असणाऱ्या या किल्यावर नाशिकहून दोन वेगवेगळ्या मार्गाने जाता येते . नाशिकहून गंगापूर रोडमार्गे गिरणारे गावातून हरसूलला जाणाऱ्या रस्त्यामार्गे आणि नाशिकहून त्रंबकेश्वर मार्गे हरसूल जाणाऱ्या रस्त्याने गडा