पोस्ट्स

नोव्हेंबर १९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत चीन संघर्ष आणि जागतिक राजकारण हे सुलभतेने उलगडणारे पुस्तक " "शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत चढती कमान वाढते तणाव"

इमेज
चीन, ज्या 7देशांबरोबर भारताची जमिनीवर सीमा आहे त्या देशांमध्ये दुसरी मोठी भुसीमा असणारा देश म्हणजे चीन, (पहिली बांगलादेश {भारत बांगलादेश सीमा वेडीवाकडी असल्याने सहज लक्षात येत नाही.मात्र ती सीमा सरळ केल्यास भारताची सर्वाधिक सीमा बांगलादेशाबरोबर आहे}) नकाश्यात ज्या देशाची भारताबरोबरची सीमा बघताना अनावधानाने नेपाळ आणि भुतान बरोबरची त्या देशाची  सीमा देखील भारताची सीमा समजली जाउ शकते असा देश म्हणजे चीन, आपणावर 1962साली युद्ध लावणारा देश म्हणजे चीन, भारताबरोबर ब्रिक्स, एस.इ ओ तसेच  एशियन डेव्हलपमेंट  फंड सारख्या  जागतिक व्यासपीठांवर बरोबरचे स्थान मिळवणारा देश म्हणजे चीन. तर असा चीन भारताचा शत्रू आहे की स्पर्धक आणि भारत आणि चीन या दोन देशांतील राजकारणाचे जागतिक संदर्भ समजून घेयचे असल्यास ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी लिहिलेले आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित असे "शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत चढती कमान वाढते तणाव" हे पुस्तक वाचायलाच हवे. जे मी नुकतेच सावाना घ्या मदतीने वाचले.       22 प्रकरणातून त्यांनी हा विषय सविस्तरपणे मांडला आहे.सुमारे 214 पानांच्या या पुस्तकात सु