पोस्ट्स

जानेवारी २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत अमेरिका संबंधात कटुता ?

इमेज
भारत आणि अमेरिका या  देशांमध्ये संबंधात कटुता तर   निर्माण होणार नाहीना ? अशी शंका उपस्थित करणारी एक घडामोड नुकतीच घडली. त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन तर जगात मुक्तपणे व्यापार व्हावा, यासाठी कार्यरत असणाऱ्या, जागतिक व्यापार संघटनेने(WTO) जागतिक व्यापारात सर्वांना समान संधी मिळाव्यात,  या हेतूने सबसिडीबाबत काही बंधने घातली आहेत. त्यातील गहु उत्पादनाविषयीच्या तरतूदींचे भारताच्या सरकारकडून उल्लंधन होत आहे, ज्यामुळे भारतीय गहु उत्पादन आणि अमेरीकी गहु उत्पादक यांच्यात निकोप स्पर्धा होत नाहीये, तरी जागतिक व्यापारी संघटनेने आवश्यक ती पाउले उचलण्यासाठी अमेरीकेने जागतिक व्यापार संघटनेवर दबाब टाकावा ,असी मागणी काही अमेरीकी क्राँग्रेसच्या सदस्यांनी बायडन प्रशासनाकडे केली आहे. त्यांचा मते भारतासारख्या विकसनशील देशांना उत्पादन खर्च्याचा जास्तीत जास्त 10% सबसिडी देण्यास मान्यता असताना ,भारत आपल्या गहु उत्पादकांना तब्बल 50% थोडी अधिक सबसिडी देत आहे. जे जागतिक व्यापार संघटनेच्या तत्वाचा विरोधात असल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे. ही मागणी प्राथमिक  स्तरावरची आहे . ही मागणी  स्तरावर मांडण्यात आली आहे.