पोस्ट्स

एप्रिल २७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माहितीपट एका धडपडीचा .. शहाण्यांचा सायकिऍट्रिस्ट

इमेज
               मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे  सांगत समर्थ रामदास स्वामी १७व्या शतकातच एखादे कार्य यशस्वी होण्यासाठी निरोगी प्रसन्न मनाचे किती महत्व आहे हे सांगितले समर्थ रामदास स्वामी यांच्याच मनाचे श्लोकात देखील मन किती महत्वाचे आहे  "हे मना सांगा मना रावणा काय झाले अकस्मात राज्य ते राज्यही सर्वही बुडाले या सारख्या श्लोकातून मन खंबीर असणे किती आवश्यक आहे हे पुन्हा पुन्हा सडांगितले आहे . समर्थ रामदास स्वामी यांच्यानंतर २० व्या शतकात जळगावच्या कवियत्री बहिणाबाई यांनी त्यांच्या "मन वढाय  वढाय" सारख्या कवितेतून मनाच्या चंचलतेबाबत  सांगितले आहे आपल्या दुर्दैवाने या सारख्या  मोजक्या व्यक्तींचा अपवाद वगळता  आपल्या आयुष्यातील महत्वाच्या मात्र दुर्लक्षित अश्या मन या गोष्टीकडेआपण दुर्लक्षच केलेलं दिसते . मानवी वर्तनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवणाऱ्या मन या गोष्टीबाबत सकारात्मक दृष्टिकोन उराशी बाळगत फक्त रुग्णासाठीच नव्हे तर सर्वसामन्य व्यक्तींच्या उत्कर्षासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती,  संस्था त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.  या अश्या महत्त्वाच्या गोष्टीपैक