पोस्ट्स

फेब्रुवारी ६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खगोलशास्त्रातील अदभूत शोधाची कहाणी !

इमेज
           सध्या आपल्या भारतात कृषी कायद्यामुळे, तसेच पेट्रोल दरवाढीमुळे देश ढवळला जात असताना, खगोलशास्त्रज्ञांना एक महत्त्वाचा शोध लागला आहे. मराठी माध्यमांतून याविषयी फारच कमी माहिती दिली जात असल्याने त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन .       तर मित्रांनो खगोलशास्त्रांना आपल्या पृथ्वीपासून 13 अब्ज प्रकाशवर्षे दूर क्वार्ससचा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांनी याचे नामकरण क्येसार JO313_1806 असे केले आहे. सन 1950 मध्ये मानवास क्येसार ही संकल्पना माहिती झाल्यापासून  आतापर्यत शोधलेल्या क्येसारमध्ये हा क्येसार सर्वात लांबचा क्येसार आहे. हा क्येसार इतका तेजस्वी आहे की याला 13अब्जाच्या ऐवजी 100 प्रकाशवर्षे दूर ठेवले तर हा क्वार्स सुर्याइतका प्रकाशीत दिसेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. खगोलशास्त्रज्ञांनी या क्येसारची प्रकाशमानता +7.7 इतकी निर्धारीत केली आहे. शास्त्रज्ञांनी या क्येसारची निर्मिती विश्वनिर्मितीनंतर 6लाख 70 हजार  वर्षापुर्वी निर्मिती झाली असावी, असा कयास बांधला आहे. Cerro Telolo Inter American वेधशाळेच्या Bianco 4 या दुर्बिणीमार्फत हा क्येसार शोधला गेला आहे. विश्वनिर्मितीच्या वेळी दि