पोस्ट्स

मे २८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अबतक 531

इमेज
         आज 28 मे 2020 अर्थात महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने  सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अहमदनगर शहराचा 531वा वाढदिवस . सध्या प्राप्त असणाऱ्या इतिहासाच्या पुराव्यानुसार अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 साली झाली  त्या अर्थाने आजच्या दिवशी अहमदनगर शहर 531 वर्षाचे झाले . त्या निमित्याने समस्त अहमदनगरवासीयांचे अभिनंदन .             अहमदनगर एकेकाळचे जगातील सर्वात उत्तम शहर . आताच्या काळात आपण जसे मुंबईचे शांघाय करू असे म्हणतो . त्याप्रमाणे जगातील राज्यकर्त्यांनी आम्ही आपल्या शहराचे अहमदनगर करू असे एकेकाळी  निवडणुकीत वचन द्यावे असे शहर .. आपल्या महाराष्ट्राची एसटी पहिल्यांदा ज्या दोन शहरादरम्यान धावली त्यापैकी एक शहर . जगातील मोजक्या अश्या शहरांचा स्थापनादिवस आपणस ज्ञात आहे  त्या  मोजक्या शहरांपैकी एक शहर म्हणजे अहमदनगर . आपल्या भारतात कोणत्याही प्रकारच्या नव्या वाहनांनाबाजारपेठेत येण्यासाठी . ज्या शहरातील चाचणीला सामोरे जावे लागते , ते शहर म्हणजे अहमदनगर .  आपल्या भारतातातील महत्तवाची वाहन कंपनी असणाऱ्या कायनेटिक कंपनीचे मुख्यालय असणारे अहमदनग