पोस्ट्स

जुलै २९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिवस सध्या मेट्रोचे

इमेज
           आपल्या देशात सध्या सर्वत्र मेट्रोचे जाळे तयार करण्याचा कृतीने वेग पकडला आहे . मोठ्या शहरांबरोबर नाशिकसारख्या मध्यम शहरात देखील सार्वजनिक वाहतूकीसाठी मेट्रो वापरण्याचे शासनकर्त्यांचे धोरण आहे . सार्वजनिक वाहतूकीसाठी बस, टँक्सी, अँटोरिक्षा आदी पर्याय सुद्धा आहेत , या पर्यांयामध्ये योग्य त्या सुधारणा केल्यास मेट्रो उभारणीला लागणाऱ्या पैसापेक्षा कमी खर्चात सहजतेने अत्यंत सक्षम सार्वजनिक वाहतूक  व्यवस्था सहजतेने उभारता येवू शकते .                    माझा मेट्रोचा उभारणीला विरोध नाही . मुंबई सारख्या महानगरात ती उभारलीच पाहिजे . मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मेट्रो हाच एकमेव पर्याय  उपलब्ध असल्याचे भासवले जात आहे . माझा या गोष्टीला विरोध आहे .  . नाशिक सारख्या मध्यम आकाराचा शहरात BRT सारखे कमी खर्चात सहज राबवता येणारे उपक्रम राबवले तरी खूप चांगला परीणाम दिसू शकतो . नाशिक शहरात शेअर अँटोरिक्षा ही अत्यंत चांगली प्रणाली कार्यरत आहे . या प्रणालीमध्ये काही दोष असतील तर ते दुर करायला हवेत . न की ती प्रणालीच पुर्णपणे नाकारणे . आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील शर