पोस्ट्स

ऑगस्ट १४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील पाकिस्तान (भाग12 )

इमेज
              आपल्या महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी सत्ताधिकारी आणि विरोधी पक्षाकडून विविध दावे प्रतिदावे केले जात असतांना आपल्या भारताबरोबरच स्वातंत्र्य मिळालेल्या मात्र विकासाच्या बाबतीत आपल्यापेक्षा कैक वर्ष मागे असणाऱ्या आणि आपले शत्रू राष्ट्र असणाऱ्या  पाकिस्तानबाबत चार घडामोडी घडल्या . आपणास आपल्या शत्रूची पूर्ण माहिती असायलाच हवी असे आर्य चाणक्याचे वचन आहे याच वचनाला जागत या घडामोडींविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन या चार घडामोडींपैकी दोन घडामोडी प्रत्यक्ष आपल्याशी संबंधित आहे तर दोन घडामोडी चीन पाकिस्तान संबंधाविषयी आहे         पहिल्यांदा चीन पाकिस्तनविषयक घडामोड बघूया या 2 घडामोडींपैकी एक चीनमार्फत पाकिस्तानमध्ये  उभारण्यात येणाऱ्या विकासप्रकल्पाविषयी आहे एक पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याविषयी आहे  तर मित्रानो , चीनतर्फे पाकिस्तानात चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (जो सिपेक या नावाने प्रसिद्ध आहे . ) अंतर्गत विविध विकासकामे सुरु आहेत त्या अंतर्गत पाकिस्तानच्या खैबर ए पखतनूंवा ( आपल्याकडे वायव्य सरहद प्रांत नावाने प्रसिद्ध ) या प्रांतात एक धरण बांधण्याचे काम सुरु होते