पोस्ट्स

जुलै १६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नव्या सामाईक चलनाचा प्रसवकळा,

इमेज
सध्या भारतात प्रसिद्दीभिलाषी लोक प्रसिद्धीसाठी  नवनवीन फंडे  अमलात आणत असले, भारताला न मिळालेल्या क्रिकेटच्या विश्वचषकाचा बाबत कवित्व करत असले तरी,  जगाच्या अर्थकारणात आमूलार्ग बदल होत आहेत .  आफ्रिकेच्या पश्चिम  भागातील 15 राष्ट्रांनी समाईक चलन स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय हा त्यापैकीच एक . भलेही जागतिक राजकारणात या राष्ट्रांचे महत्व यत्किंचित  असेल,  मात्र जगाची पऊले कोणत्या दिशेने जात आहेत याची चुणूक यातून दिसते . आपण खाली दिलेल्या नकाशात या देशांचे स्थान बघू शकतात . हे 15 देश पूर्वी फ्रान्सची वसाहत होते . त्याचा खुणा आजही या देशात आपणास दिसतात . या 15 देशांपैकी आठ देशांच्या मध्यवर्ती बँकेचे रोखे हे फ्रान्सच्या बँकेत ठेवले आहेत . फ्रान्सतर्फे त्यांचे चलन प्रसारित केले जाते .  तुम्हाला शेजारी आफ्रिकेच्या नकाश्यात जो हिरवा रंग दिसतोय त्या देशात सन 2020 च्या अखेरपर्यंत ECON  हे सामायिक चलन वापरण्यास सुरवात झाली असेल . आपसातील व्यापारामध्ये सुलभता यावी , या प्रमुख उद्देश्याने त्यांनी हे पाऊल उचललंय या प्रमुख उदेश्या बरोबरच परस्परांच्या देशात पर्यटन वृद्धी व्हावी हाही उदेष्य या