पोस्ट्स

फेब्रुवारी २०, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

इमेज
           मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले.त्यातील काही मी या आधी सांगितले आहेतच .त्यातील न सांगितलेले अनुभव आपल्यापर्यत पोहोचण्यासाठी आजचे लेखन.                    तर मित्रांनो, मी माझ्या पर्यटनाच्या तयारीची सुरवात संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरून त्या त्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेवून करतो ,हे आपणास आता ज्ञात झाले असेलच.त्यानुसार माहिती घेत मी सांगली जिल्हा स्थळदर्शनासाठी निघालो असताना नाट्यमय प्रसंग घडला. त्यांचे झाले असे की,   नरसोबाची वाडी हे देवस्थान सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असले तरी, प्रशासकीयदृष्ट्या ते कोल्हापूर जिल्ह्यात येते. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर त्याची माहिती नव्हती, आणि मी  सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा वेबसाइटवर आधारीत माझा स्थल दर्शनाचा कार्यक