पोस्ट्स

ऑक्टोबर ३०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिगूल 46व्या अमेरीकी अध्यक्षाचे (भाग 7वा)

इमेज
                         गेले वर्षभर सुरु असलेल्या 46व्या अमेरीकी अध्यक्ष निवडीची प्रक्रीया आता आंतीम टप्यात आली आहे. मी गेली वर्षभर या विविध टप्यांची माहिती वेळोवेळी दिली आहे. ज्यांना ती वाचायची आहे, त्यांचासाठी मी मागील लेखाच्या लिंक या लेखाच्या खाली दिलेल्या आहेत,असो.            येत्या मंगळवारी अर्थात 3 नोव्हेंबर रोजी जरी अमेरीकेत 46 व्या अध्यक्षासाठी प्रत्यक्ष मतदान होणार असले, तरी करोना संसर्गाचा पार्श्वभुमीवर अमेरीकेत प्रत्यक्ष मतदानदिनाच्या आधीच सुरु असलेल्या टपाल मतदानाद्वारे  मतदान करण्यास अधिकाधीक अमेरीकी नागरीक प्राधान्य देत आहेत. Fox Newsने दिलेल्या वृत्तानुसार मागच्या 2016 मध्ये आलेल्या टपाल मतदानापेक्षा 60%अधिक मतदान यावेळी टपाल मतदानाने झालेले आहे. या आधी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीनूसार जाँन बायडन पुढे होते . ते आता प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीत देखील पुढे आहेत. मात्र त्यांची आघाडी पुर्वीपेक्षा कमी झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा करोना संसर्गामुळे मुळच्या नियोजनानुसार असलेल्या 3 असणाऱ्या अध्यक्षीय उमेदवारांचा चर्चा (presidential Debate) या दोनच घेण्यात आल्या . क्रमांक