पोस्ट्स

जून २०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कालिदास दिन चिरायू होवो

इमेज
                     येत्या सोमवारी अर्थात 22जूनला आषाढ महिना सुरु होत आहे .आषाढ महिन्याचा पहिला दिवस कालीदास दिन म्हणून साजरा करण्यात येतो . कालीदास संस्कृत भाषेतील एक अजरामर कवी .जन्मतः मेंढपाळ म्हणून जन्माला आलेला एक अशिक्षीत व्यक्ती , राजकन्या असलेल्या पत्नीने अशिक्षीत असलेच्या कारणावरून अपमानित केल्यावर काली देवीची उपासना करुन विद्वान झालेला कवी म्हणजे कालीदास . जर्मन भाषेतील ख्यातनाम कवी गटे यांनी ज्या संस्कृत भाषेतील काव्याचा इंग्रजी अनुवाद वाचून आनंदाने नाच केला असे काव्य अर्थात शाकुंतल या महाकाव्याचा रचेता म्हणजे कवी कालीदास .  पावसाचे ढग बघून प्रेम विरहाचे काव्य रचणारा कवी म्हणजे कवी कालीदास .या महान कवीचा संमननार्थ  साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे कालीदास दिन . त्या निमित्ताने समस्त साहित्यप्रेमींना शुभेच्छा                       कालीदास हा प्राचीन भारतातील एक महत्त्वाचा कवी म्हणून विख्यात आहे .त्याचे शांकूतल, मेघदूत आदि महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. अनेक काव्यरस त्यांचा काव्यातून सहजतेने दिसतात. निसर्गातील चमत्कारांवर आधारीत त्यांनी रचलेले मेघदूत हे काव्य त्याचीच साक्ष