पोस्ट्स

नोव्हेंबर २४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संविधानाची ७० वर्षे

इमेज
                           दोन वर्षे ११ महिने १८ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर २६ नोव्हेंबर १९४९ ला भारताच्या संविधान समितीने  संविधान तयार केले . आजच्या २६ नोव्हेंबर २०१९ ला या घटनेला ७० वर्षे पूर्ण होतील . कोणत्याही देशाच्या वाटचालीत त्या देशाचे संविधान अत्यंत महत्वाची भूमिका बजावते . देशाची प्रगती तेथील राजकीय परिस्थिती तेथील संविधानावर अवलूंबून असते . आपल्या भारताचा शेजारी असणाऱ्या नेपाळ या देशात संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे झालेली परिस्थिती आपण बघत आहोच . पाकिस्तानची सध्याची   परिस्थितीसुद्धा त्याचे पहिले  संविधान निर्मितीला लागलेल्या विलंबामुळे  (आज पाकिस्तानात ३ रे संविधांची अंमलबजावणी सुरु आहे ) निर्माण झालेली आपण बघत आहोत .  त्यामुळे भारतासारख्या विविधेतेनेने नटलेल्या देशाचे संविधान तयार करणाऱ्या सर्व कायदेपंडितांना या निमित्याने विनम्र अभिवादन .           भारताचे संविधान तयार करताना घटना समितीमध्ये झालेली चर्चा उपलब्ध आहे . तुम्ही या ब्लॉगच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लीककरून तुम्ही ही चर्चा बघू शकतात . मित्रानो आपल्या संविधानात सर्व गोष्ट सविस्त

हे बी घडतंय जगामंदी (भाग एक )

इमेज
                              सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना ,जगात अनेक घडामोडी घडत आहेत. जसे डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियोगाचा खटला , युनाटेड किंग्डम या देशात १२ डिसेंबरला होणाऱ्या मध्यवर्ती सार्वत्रिक निवडणुका आणि त्याचा संबंधित घडामोडी , दक्षिण अमेरिका खंडातील  अनेक देशात होणारे राजकीय आणि आर्थिक कारणामुळे  होणारी  आंदोलने ,तसेच चीनच्या हाँगकॉग  या प्रदेशातील स्थानिक निवडणुका, इंडोनेशिया, इराण या आशिया खंडातील  देशातील आंदोलने , फ्रान्सच्या महिलांनी राजधानी पॅरिसमध्ये  फ्रान्समध्ये युरोप खंडातील   सर्वाधिक होणाऱ्या महिला  अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष  जावे म्हणून काढलेला मोर्चा ही त्यांची काही प्रमुख उदाहरणे होय . यातील प्रत्येक घडामोंडीचा आपल्या भारतावर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडणार आहे . त्यामुळे या गोष्टींची तोंड ओळख का होईना करून देण्याच्या माझा या ब्लॉग पोस्ट मधून प्रयत्न असणारा आहे . आता बघू सविस्तर .                                 हा लेख लिहीत असता