पोस्ट्स

ऑक्टोबर २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एसटीचे खरे शत्रू !

इमेज
        आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या साठी एसटीने  आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना   अनुक्रमे  जेमतेम अडीच आणि पाच हजाराचा बोनस दिला.  मी जेमतेम हा शब्द वापरतोय कारण पुरेसे करसंकलन न झाल्याने  आर्थिक स्थिती दोलायमान असणाऱ्या नाशिक महानगरपालिकेने आपल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १५ हजार बोनस दिला आहे . एसटीच्या सध्याच्या या आर्थिक स्थितीला अनेक घटक कारणीभूत आहेत ज्यामध्ये राज्य सरकारकडून विविध सवलतींचे अनुदान वेळेत न मिळण्याबरोबरच आपल्या महाराष्ट्राच्या एसटीला इतर राज्यातील एसटीकडून देण्यात येणारे आव्हान हे प्रमुख धोके आहेत             आपल्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तालुक्यात इतर राज्याचा एसटी आपली सेवा देतात . त्यासाठी ते आपल्या एसटीच्या जागांचा वापर करतात  आपण एकवेळ खासगी बसवाहतूकदारांना बसस्थानकापासून काही अंतरावरच व्यवसाय करावा असे बंधन घालू शकतो. मात्र या इतर राज्यातील परीवहन सेवांना असे बंधन घालणे निव्वळ अशक्य आहे नाशिकहून वायव्य कर्नाटक राज्य परिवहनाच्या ३ बसेस बेळगावला जातात .मात्र महाराष्ट्राची एकही बस नाशिकहून बेळगावला जात नाह