पोस्ट्स

सप्टेंबर २८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परग्रहवासीची अदभुत कहाणी,..प्रेषित...

इमेज
 पृथ्वीखेरीज अन्यत्र कुठे जीवसृष्टी आहे का? याबाबत मोठी उत्सुकता राहिलेली आहे.परग्रहवासीयांना बघीतले असल्याचे दावेही वारंवार करण्यात येतात.काही दिवसांपूर्वी मेस्किको या देशांमध्ये परग्रहवासीयांची दोन प्रेते सापडल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. उडत्या तबकड्यामधून परग्रहवासी आपल्या  पृथ्वीवर वारंवार  येत असल्याचे सातत्याने  सांगितले जाते.परग्रहवासी या विषयावर हॉलीवूडमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील  चित्रपट  येवून गेले आहेत. इंग्रजी आणि मराठीत यावर मोठ्या प्रमाणात लिहले गेले आहे, जे मुख्यतः माहितीपर आहे. इंग्रजीमध्ये हा विषय साहित्याचा कलाने सुद्धा लिहिला गेला आहे.मात्र आपल्या मराठीचा विचार करता साहित्याचा अंगाने तूरळकच लिहले गेलेले आहे. मराठीत जे काही तूरळकच साहित्याचा अंगाने लिहले आहे,त्यातील एक प्रमुख पुस्तक म्हणजे, डॉ.जयंत नारळीकर यांनी लिहलेली प्रेषित ही मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित कांदबरी. जी मी नुकतीच वाचली.  सूमारे सव्वाशे पानांची ही लघू कांदबरी विविध प्रकरणांमध्ये विभागली गेली आहे. या कादंबरीत एका प्रगत जीवसृष्टीतील एक मुलगा एका अपघातामुळे एकटाच आपल्या पृथ्वीवर येतो ,त्यांचे संग