पोस्ट्स

नोव्हेंबर ११, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचा इतर देशात डंका

इमेज
                         सध्या आपल्या भारतातील मुख्य धारेतील माध्यमे अनेक काहिस्या निरुपद्रवी, मुद्यांवर चर्चेची गुऱ्हाळे चालवत असताना,समस्त भारतीयांची मान गर्वाने ताठ व्हावी , अस्या दोन घटना घडल्या. त्याविषयी पारंपारीक माध्यमांमध्ये फारसी चर्चा न झाल्याने त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.                  तर जागतिक व्यापाराच्या दृष्टीने मोक्याचा ठिकाणी वसलेल्या आणि सन 2008 पासून चीन ज्या क्षेत्रात विविध गोष्टींमार्फत आपले अस्तिव दाखवून देत आहे, अस्या लाल समुद्र आणि एडनच्या आखात तसेच अरबी समुद्र  यांच्या मध्ये नकाश्यामध्ये  गेड्यांचा शिंगाप्रमाणे भासणाऱ्या  भुप्रदेशातील अर्थात हाँन आँफ आफ्रिका या भागातील नागरीकांना  भारताच्या नौदलामार्फत मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली.भारतीय नौदलाच्या आय एन एस ऐरावत या जहाजामार्फत हाँन आँफ आफ्रिका भागातील नागरीकांना 155 मेट्रीक टन गव्हाचे पीठ, 65 मेट्रीक टन तांदूळ आणि 50 मेट्रीक टन साखर असा एकदंरीत 270 मेट्रीक टन अन्नसाठा नुकताच वितरीत करण्यात आला. या भागातील सोमालीया, इथोपिया , डिबुटी आणि इरेट्रीया या देशात हे धान्य वितरीत करण्यात आले होते . सदर  भाग