पोस्ट्स

सप्टेंबर २३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामी विवेकानंद यांची पत्रे...मनाला नैराश्यापासून दूर ठेवणारे पुस्तक

इमेज
समर्थ रामदास स्वामी यांनी मन या अवयवाचे मानवी आयुष्यातील महत्व स्पष्ट करताना  सांगितले आहे की, "मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" जे अत्यंत खरे असल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले देखील असेल.मात्र आपल्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या या मनाला प्रसन्न कसे करायचे याचे उत्तर आपणास हवे असेल तर त्याचे उत्तर अत्यंत सोपे आहे, ते म्हणजे,स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले साहित्य वाचायचे. आपण कितीही मोठ्या नैराश्यात असो, स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले कोणतेही पुस्तक वाचले की, नैराश्य आपल्यापासून कैक मैल दुर गेलेच पाहिजे. स्वामी विवेकानंद यांचे साहित्य रामकृष्ण मठाच्या नागपूर शाखेमार्फत मराठीत आणले गेले आहे. त्यामुळे भाषेचा प्रश्न देखील निकालात निघाला आहे, तसेच त्याची किंमत देखील अत्यंत कमी आहे, मात्र त्यातील विचारलं मोठे अनमोल आहे.स्वामी विवेकानंद यांनी लिहलेल्या भक्तीयोग, राजयोग,प्रेमभंग सारखी पुस्तके समजली तर मोठा ज्ञानसाठा आपल्यासाठी खुला होईल. मात्र ते जर जमले नाही तर स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले पत्रांचे वाचन केले तरी आपल्याला कधीही न संपणार