पोस्ट्स

तेलंगणा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अन्य राज्य परिवहन महामंडळ आणि आपली MSRTC

इमेज
                    नुकताच काही अपरिहार्य कारणास्तव महाराष्ट्राची एसटी बस सोडून प्रत्येकी एकदा  कर्नाटक आणि गुजरात राज्यच्या एसटी बसने प्रवास करावा लागला . या प्रवाश्यादरम्यान मला वाढलेली गोष्ट म्हणजे संबंधित राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची रचना . .आपल्या महाराष्ट्राच्या बसेसपेक्षा कर्नाटकाच्या बसेस लांबीने थोड्या मोठ्या होत्या . तसेच त्या बसेसमध्ये एका रांगेत 5आसने होती . गुजरातची एसटी आपल्या महाराष्ट्र्राच्या बसेसपेक्षा लांब नव्हती याही बसमध्येएका रांगेत 5आसने होती . आपल्या महाराष्ट्राच्या बसेसमध्ये पूर्र्वी 5आसने होती . मात्र कालांतराने आरामदायी प्रवाश्यांचा प्रवास आरामदायी करण्याच्या हेतून आपल्या बसेस मध्ये एका रांगेत फक्त 4असणे ठेवण्यात येऊ लागली . मात्र या बसेसमध्ये अजून एका रांगेत पाच आसने आहेत . आपली आसने कमी का करण्यात आली ? पूर्वीप्रमाणे एका रांगेत पाच आसने असावीत . यासाठी मी एसटीच्या एका अधिकाऱ्याशी  नंतर संवाद साधला असता त्याने आपली भौगोलिक परिस्थिती कर्नाटक आणि गुजरात पेक्षा भिन्न असल्याने ते ...

गांधारीचे वंशज आणि MSRTC

इमेज
                     मी नुकताच कर्नाटक राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसबाबत मला आलेला अनुभव फेसबुकवर पोस्टचा स्वरुपात शेअर केला होता. उत्तरादखल मला  आपल्या भारतातील सर्व राज्य परीवहन महामंडळाची ASRTU (All State Road Transport Union) नावाची एक शिखर संस्था असून आंतरराज्य परीवहनाबाबत तीचे काही मार्गदर्शक तत्वे आहेत, अशी एक टिपप्णी आली . मला आपली महाराष्ट्राची एसटी प्राणप्रिय असल्याने ती नक्की काय तत्वे आहेत ?हे माहिती करुन घेण्यासाठी जेव्हा त्या संस्थेच्या संकेतस्थळावर चौकशी केल्यावर अनेक बाबी समोर आल्या, त्या तूम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . या तत्वातील महत्त्वाचे सुत्र म्हणजे जेव्हा एखादे राज्य परीवहन महामंडळ स्व राज्य सोडून अन्य राज्यात सेवा देते, त्यावेळेस आपल्या स्व राज्यातील वाहतूक दर काहीही असो,आपणास संबधीत राज्यातील परीवहन सेवेतील दरांइतके दर ठेवणे क्रमप्राप्त आहे.                          माझ्या वैयक्तीक अनुभवाच्या आधारे मी सांगू ईच्छितो की, महाराष्ट्...

जरा अन्यांचा आदर्श घ्यावा

इमेज
                      आताच टीव्हीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या दरात दिवाळीनिमित्य वाढ करण्यात आल्याची बातमी बघितली,  आणि मला २०१६ साली  याच दिवाळीच्या कालावधीत तेलंगणा राज्य परिवहनाच्या  बसने  आरक्षण करून पुणे ते सोलापूर या  दरम्यान केलेल्या प्रवासाची आठवण झाली , मी त्याआधीही आरक्षण करून सदर मार्गावर प्रवास केला होता  , जो कमी गर्दीच्या कालावधीत केला होता . आणि दुसऱ्यांदा करत असलेला प्रवास हा गर्दीच्या कालावधीत केलेला होता . या दोन्ही प्रवसांदरम्यान मला आढळलेल्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी मी आजचे लेखन करत आहे . या दोन्ही प्रवासनादरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे दोन्ही प्रवास दरम्यान पुणे सोलापूर या दरम्यानचे भाडे सारखेच होते . जे त्या वेळच्या महाराष्ट्र्र राज्य परिवहन महामंडळाच्या त्याच दर्जाच्या बसेसच्या  कमीत कमी भाड्यापेक्षा तब्बल ४० रुपये कमी होते .  मात्र दोन्ही वेळेस मला आकारण्यात येणाऱ्या आरक्षण शुल्कात तब्बल ६६ टक्क्यांचा फरक होता . कमी  ...

महाराष्ट्रत्तेर एस टी एक समस्या

इमेज
नुकतीच  मी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाला रात्री भेट दिली . तेथील दृश्य बघून  मी थबकलोच,  आपण महाराष्ट्रात नसून कर्नाटकमध्ये असल्यासारखा भास व्हावा असे ते दृश्य होते .  महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागातील शहर असूनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कर्नाटकच्या बसेसची संख्या जास्त होती . मागे मी हा प्रकार कोल्हापूर बसस्थानकावर बघितला होता .मात्र  कोल्हापूर कर्नाटक  सीमेपासून निव्वळ २५ किमी असल्याने मी हा प्रकार गांभीर्याने घेतला नव्हता . त्यानंतर याविषयीची अधिक माहिती मिळावी म्हणून कर्नाटक राज्य परिवहनाच्या  संकेतस्थळावर भेट दिली असता तेथील माहिती झोप उडवणारी होती. कर्नाटक सरकार राज्याबाहेर दुसऱ्या राज्यातील ४० मार्गावर सेवा पुरवते या ४० पैकी २९ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत .  मागे मी एकदा कराडला गेलो असता मी बेळगाव ते नीरा या मार्गावरील कर्नाटक परिवहन महामंडळाची बस ब घितली होती . मित्रानो नीरा हे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत असणारे गाव आहे . म्हणजेच तुम्ही समजू शकता कर्नाटक किती आतापर्यंत पोहोचले आहे . नाशिकहून बेळ...