पोस्ट्स

फेब्रुवारी ९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्ताने भाग४

इमेज
मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात . आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा ( नागपूर प्रशासकीय विभाग ) अपवाद वगळता आपली एसटी जाते , अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे . या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले . तेदेखील मी वेळोवेळी पर्यटनाच्या निमित्ताने भाग एक आणि   भाग दोन यामध्ये सविस्तर सांगितले आहेच . ज्यांना ते वाचायचे असतील अस्या व्यक्तींना ते शोधणे सोईस्कर   व्हावे यासाठी त्यांचा लिंक मी खाली देईलच . या लेखात माझ्या फिरण्यात ज्या बाबी मला दिसून आल्या त्याविषयी मी बोलणार आहे .     तर मित्रांनो , मी माझ्या फिरण्याची तयारी करताना संबधित जिह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर जावून संबंधित जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेत माझ्या फिरण्याचे नियोजन करतो . या दरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे , पालघर जिल्ह्याचा अपवाद वगळता अन्य सर्व जिल्ह्याचा वेबसाइट नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरकडून संचलित करण्यात आलेल्