भाउबीज विशेष
आज दिवाळीचा शेवटचा दिवस अर्थात भाउबीज , भाउ आणि बहीणीचा नात्याचा हा दिवस आजच्या दिवशी पुरुषाने आपल्या पत्नीचा हातचे न खाता,आपल्या बहीणीचा हातचे खाणे शुभ मानले जाते.आजच्या दिवशी यमुना नदीने आपला भाउ यम यास ओवाळले होते . त्यामुळे प्रसन्न होवून आजच्या दिवशी जी स्त्री आपल्या भावाला ओवाळेल, त्या दोघांना दिर्घायू मिळेल, असा आशिर्वाद दिला .ज्यामुळे याला यमद्वितीया असे देखील म्हणतात. कायस्थ समाजबांधव या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवान...