पोस्ट्स

ऑक्टोबर ६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ड्रँगन जागा झाला आहे!

इमेज
                          स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या पहिल्या अमेरीकेच्या दौऱ्याचा वेळी अमेरीकत जाण्यासाठी, भारताहून आग्रेय आशिया, चीन, जपान हा मार्ग निवडला होता.त्यावेळी त्यांची बोट चीन आणि जपान येथे थांबली असता, चीनी आणि जपानी लोकांचे निरीक्षण केल्यावर त्यांनी या दोघांचे वर्णन निदीस्त ड्रँगन असे केले होते. जेव्हा हे ड्रँगन जागे होतील तेव्हा जगाची झोप उडवतील, असे भाकित त्यांनी केले होते.जे आता चीनबाबत  सत्यात येताना दिसत आहे.   .                 गेल्याच आठवड्यात चीनने तैवानच्या हवाई हद्दीत केलेल्या घुसखोरीमुळे चीन पुन्हा एकदा आक्रमक राष्ट्रवादाचे धोरण अमलात आणत  असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.  गेल्या आठवड्यात तैवान या देशाच्या हद्दीत  चीनच्या विविध चार प्रकारच्या एकूण ५६ लष्करी  विमानांनी घुसखोरी केली. चीनच्या मते तैवान हा चीनचाच फुटून निघाललेला भाग आहे.  सबब त्यांनी त्यांच्याच हद्दीत विमाने उडवली असल्याने तो आंतराष्ट्रीय संकेताचा भंग ठरत नाही . याबाबत तैवानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया तैवाननची  चीनविरुद्ध लढ्याची तयारी झाल्याचे संकेत देणारी होती अत्यंत कडक शब