पोस्ट्स

डिसेंबर १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

इमेज
       गोवा,  ४५१ वर्षे युरोपीय देशाच्या अमलाखाली असणारा प्रदेश , भारत  ब्रिटिशांकडून १९४७ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाल्यावर  १४ वर्ष १२६ दिवसांनी स्वतत्र झालेला भारतातील भूभाग म्हणजे गोवा  युरोपीय सत्ताधाधिशानी समुद्रमार्गे भारतातच्या ज्या भूभागावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तो भूभाग म्हणजे गोवा . पोर्तुगाल या युरोपीय देशाने ज्या भारतीय भूभागाला ओव्हरसिस पोर्तुगाल म्हणून मान्यता देण्याची गोष्ट केली डिसेंबर १९६२ नंतर  काही काळ सातत्याने  आणि आज  देखील कधी कधी पोर्तुगाल ज्या भारतातच्या भूभागाबाबत  भारताने  तो भाग अनधिकृतपणे ताब्यात ठेवला असा आरोप  करण्यात येतो तो भाग म्हणजे गोवा.  पंडित नेहरूंच्या मुत्सद्दीपणाची खंबीरपणाची साक्ष देणारी धाडसी कृती म्हणून ज्या ऑपरेशन विजय चा उल्लेख करण्यात येतो.  ते ऑपरेशन विजय ज्या भूभागासाठी होते तो भूभाग म्हणजे गोवा   येत्या रविवारी अर्थात १९  डिसेंबर २०२१ रोजी गोव्याच्या ६०वा स्वातंत्र्यदिन  आहे .त्या निमित्याने समस्त हा लेख वाचणाऱ्या समस्त गोववासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा .  मधू लिमये सारख्या समाजवादी नेत्यांची गोव्याचा स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका होती