पोस्ट्स

नोव्हेंबर १६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गृहाळ सुरूच

इमेज
          युनाटेड किंग्डम   ( युनाटेड किंग्डम या देशाला आपल्या कडे सर्वसाधारणपणे इंग्लंड म्हणतात ) या देशातील स्कॉटलंड या भागाची राजधानी असणाऱ्या ग्लासको या शहरात सुरु असलेली कॉन्फरन्स ऑफ पार्टीजचे  २६ वे  अधिवेशन १२ नोव्हेंबर २०२१ रोजी कोणत्याही ठोस कार्यक्रम आणि उद्धिष्टांशिवाय पार पडली . कोळशाच्या वापर बंद कारण्यावरून भारत चीन या गटाचे पश्चिम युरोपीय राष्ट आणि अमेरिकेच्या गटाबरोबर तीव्र स्वरूपाचे मतभेद  झाल्याने तसेच अविकसित किंवा अल्पविकसित देशांना पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी निधी पुरवण्यावरून सदस्य राष्ट्रांत मतैक्य न झाल्याने ही परिषद एक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी केलेला कार्यक्रम म्हणून त्याचे स्वरूप राहिले . ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान  अधिवेशन इटली आणि युनाटेड किंग्डम या देशांद्वारे संयुक्तरित्या आयोजित करण्यात आले होते या पुढील अधिवेशन २०२२ साली इजिप्तमध्ये  होणार आहे              एकूण वापर बघितला तर भारत आणि चीन जगात सर्वाधिक कोळसा वापरतात . मात्र दरव्यक्ती कोळस्याचा खप बघितला तर जागतिक सरासरीच्या तिप्पट वापर अमेरिकेकडून होतो  तर कोळस्याकडून वातावरणात होणारे कार्बनच