पोस्ट्स

स्पर्धा परीक्षा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'विवेक भीमनवार' सर हे कराचं !

इमेज
  'मा.  विवेक  भीमनराव सर  स.न. वि.वि. सर सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.. !!.  आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला खऱ्या अर्थाने लोकसेवा या शब्दला सार्थ ठरवणारे  करावे या एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उमेदवार म्हणून माझ्याकडून आपल्याला सदिच्छा !! सर, गेल्या एक ते दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार अधिक उत्तम कार्यक्षम व्हावा यासाठी आपल्या आधीच्या अध्यक्षांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग आणि अन्य  लोकसेवा आयोगाचा अभ्यास दौरा केला होता. त्यांनी केलेल्या शिफारशी शक्य तेव्हढ्या लवकरात लवकर अंमलात येऊन अक्षरशः पोटाला चिमटा घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू अधिकाऱ्यांचा कष्टाचा अंत व्हावा ही आमची माफक अपेक्षा तुम्ही नक्कीच पूर्ण कराल असे म्हणायला हरकत नसावी.  सर  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार वेगाने केंद्रीय  लोकसेवा आयोगाचा धर्तीवर होत आहे .मुख्य परीक्षेची पद्धत पूर्वीप्रमाणे दीर्घोत्तरी होत आहे. ही बाबा कौतुकास पात्रच आहे यात शंका नाही. मात्र आपल...

असे अधिकारी न झालेलेच बरे

इमेज
पुणे शहरात नविन वर्षाची सुरवात झाली ती आंदोलनाने. महाराष्ट्र पोलिस दलात भावी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन तयारी करणाऱ्या उमेदवारांनी त्यासाठी होणाऱ्या परीक्षेला बसण्यासाठी  वयोमर्यादेत वाढ करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले. या पुर्णत: चूकीच्या गोष्टीसाठी सुरू झालेल्या आंदोलकांना त्यांची योग्य जागा दाखवत राज्य सरकारने त्यांचा मागण्यांना वाटाण्याचा अक्षता दाखवल्या,जे योग्यच आहे. जाहिरात उशीरा आल्यामुळे काही जणांची वयोमर्यादा उलटून गेली आहे, असे अत्यंत हास्यापद कारण आंदोलकांनी दिले होते‌. ज्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची किमान आवश्यकता ही पदवी आहे.जी वयाच्या २१ व्या वर्षी फार फार उशीरा म्हटले तर २३ वर्षाचे झाल्यावर मिळून जाते.तीला ३०/३२ वय एव्हढे वय ही अंतीम मुदत असताना या भावी अधिकाऱ्यांना त्यात १ वर्षाची वाढ हवी होती. समजा मास्टर ड्रिग्री मिळाल्यावर त्यांनी या परीक्षेचा विचार केला तर ते २३ किंवा २५ व्या ते या परिक्षेचा अभ्यास सुरू करतील. आता हा अभ्यास सुरु केल्यावर अंतीम वयोमर्यादा होणेपर्यत जी ५ ते ७ वर्षे काही उदाहरणात तर तब्बल ९ वर्ष मिळतात. त्यात त्यांना अरे हे मला जम...

यूपीएससी बदलाच्या वाटेवर , एमपीएससीत कधी होणार बदल ?

इमेज
       लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या प्रशासनाची आपल्या भारतात अत्यंत मजबूत व्यवस्था आहे किंबहुना अशी व्यवस्था असे हे आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट समजले जाते देशातील हा प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी दोन स्वायत्त संस्था कार्यरत आहेत प्रशासनातील जिल्हाधिकारी सारख्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी केंद्रीय स्तरावरची  यंत्रणा कार्यरत आहे जिला आपण युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात यूपीएससी या संक्षिप्त नावाने ओळखतो .उपजिल्हाधिकारी आणि त्यासारखी प्रशासनातील पदांवर कोणी काम करायचे यासासाठी देशभरात त्या त्या  राज्याचे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत या  स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनपैकी एक म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन .जी एमपीएस्सी  या नावाने प्रसिद्ध आहे          हे सांगायचे कारण की . देशपातळीवर अधिकारी निवडणाऱ्या  यूपीएससीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत.  सरकारचे कार्य सुरळीत होण्यासाठी   खासदारांच्या अनेक समित्या कार्यरत असतात . या समित्या अभ्यासपूर्ण अहवाल स...

हि तरुणाई प्रशासनातील आव्हाने पेलू शकेल ?

इमेज
राज्य लोकसेवा आयोगाच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या  परीक्षेद्वारे राज्य प्रशासनातील वर्ग एक आणि दोनच्या अधिकारीवर्गाच्या पदावर  नियुक्तहोण्यासाठी प्रयत्नशील युवकांच्या  आणि युवतींच्या आंदोलनाने १३ जानेवारीचा संपूर्ण दिवस धगधगता ठेवला . ज्याचा जोर प्रामुख्याने पुण्यात होंता मात्र औरंगाबाद कोल्हापूर या  शहरांसह  राज्यभरात ठिकठिकाणी  याबाबतचे आंदोलन झाले .गेल्यावर्षी  २६ जूनच्या  सुमारास महाराष्ट्र लोकसेवा  आयोगाने अभ्यासात केलेले बदल मागे घेऊन जुन्याच पद्धतीनेपरीक्षा घेण्यात याव्यात अशी उभा भावी अधिकाऱ्यांची (?) मागणी आहे आम्ही सुमारे  दोन वर्ष आधीपासून या परीक्षेचा अभ्यास करत आहोत . आम्हाला इतक्या  लवकर हे बदल स्वीकारत नव्याने अभयास करणे जमणार नाही तरी या बदलानुसार परीक्षा २०२५ पासून घेण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे          या भावी अधिकऱ्यांची मागणी लक्षात घेतल्यास एक  प्रश्न निर्माण होत आहे ज्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे  लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच .तर तो प्रश्न आहे  ...

एमपीएससीतील परीक्षार्थीना अंधारात ठेवून केलेलं बदल

इमेज
      सध्या महराष्ट्रातील राजकीय सत्ता नाट्याकडे महाराष्ट्रातील जनता डोळे लावून बसली असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  परीक्षार्थीना अंधारात ठेवून मोठा बदल केला आहे एमपीएससी या नावाने प्रचलित असणाऱ्या या आपल्या राज्यघटनेत  स्वतंत्रपणे उल्लेख  असलेल्या  या आयोगामार्फत राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी अनेक परीक्षांचे आयोजन करण्यात येते या आयोगामार्फत पोलीस खात्यातर्गत  लागणारे कर्मचारी तसेच  प्रशासनात लागणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर अभियांत्रीकी सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांची शासनव्यवस्थेत नेमून करण्यासाठी परीक्षा घेण्यात येत असल्या तरी राज्यशासनाच्या प्रशासनात उप जिल्हाधिकारी पर्यतच्या पदासाठी घेण्यात येणाऱ्या  तसेच पोलीस खात्यातर्गत प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींची अधिक पसंती असते     या सर्वात जास्त पसंती असलेल्या परीक्षांचे तीन टप्पे असतातपूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलखात हेच ते  तीन टप्पे यातील मुख्य परीक्षा या टप्यात खूपच मोठ्या प्रमाण...

तरुणाईचे भविष्य नासवणारा निर्णय

इमेज
      राज्यातील तरुणाईचे भविष्य नासवणारा निर्णय बुधवार १५ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला . महाराष्ट्र लोकसेवा अयोगकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची संख्या वयोमर्यादा संपेपर्यंत  अमर्याद करावयाचा निर्ययाचे या शिवाय अन्य दुसऱ्या शब्दात वर्णन करता येणे अशक्यच . मुळात आधीच अवास्तव असलेली वयोमर्यादा (खुल्या गटासाठी ३८ वर्षे तर विविध प्रकारची आरक्षण असल्यास त्या पेक्षा अधिक )  कमी करण्याची गरज असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात या निर्णयामुळे भविष्यात आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्यास आश्चर्य वाटायला नको आतापर्यंत एकाच स्वप्नील लोणकर महारष्ट्राने बघितला आहे मात्र या निर्णयाने भविष्यात असे कितीतरी स्वप्नील निर्माण होण्याचा धोका या निर्ययाने उत्पन्न केला आहे  .  मुळात अत्यंत कमी जागेसाठी निघणारी भरती, मात्र  परीक्षेसाठी प्रविष्ठ होणारी अमर्याद संख्या यांचा एकत्रित परिपाक म्हणजे अत्यंत मरणाची गळेकापू स्पर्धा असे राज्यसेवेच्या परीक्षेचे स्वरूप आहे त...

स्पर्धा परीक्षेत होरपळणारी तरुणाई

इमेज
        महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याच्या   कॅबिनेट स्तरावरील मंत्र्यांनी ११ डिसेंबरच्या रात्री आणि १२ डिसेंबरच्या पहाटे एक व्हिडिओद्वारे म्हाडा या  महानगरांमध्ये घरे तयार करणाऱ्या प्राधिकरणातील परीक्षा रद्द करत असल्याचे आणि त्या जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले . परीक्षेचे पेपर फुटले असल्याची शक्यता आहे म्हणून या परीक्षा रद्द करत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले . परीक्षेच्या आदल्या रात्री जाहीर  केलेल्या या निर्णयामुळे या या परीक्षेच्या परीक्षार्थींमध्ये अत्यंत संतापाची लाट उमटली या आधी आरोग्य खात्यातील परीक्षांमध्ये  प्रकार झाल्याच्या संशयावरून त्या परीक्षा रद्द झाल्या होत्या . या सरकारला परीक्षा योग्य पद्धतीने का घेता येत नाहीत ? अशा रास्त सवाल त्यांचा होता सध्या एसटीचा संप सुरु आहे परिणामी ग्रामीण जनतेचे प्रचंड हाल होत आहे . खासगी वाहतूकदार मनाला वाटेल त्या दारात प्रवाश्यांकडून भाडे घेत  त्यामुळे खेड्यातील परीक्षार्थी या संकटाला सामोरे जात  या परीक्षेसाठी शहारत आले होते .  ही परीक्षा रद्द झाल्यान...

घटती प्रशासनातील अधिकाऱ्याची संख्या

इमेज
      24  सप्टेंबरला मागच्या सन 2020 साली झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे निकाल जाहीर झाले .सर्वसाधारणपणे जानेवारी ते मार्च च्या दरम्यान होणारा मुलाखतीचा   टप्पा यावेळी कोरोना संसर्गामुळे बराच लांबला मुलाखतीचा टप्पा 22 २सप्टेंबररोजी संपला अन्य वेळी मुलाखतीचा टप्पा संपल्यावर पंधरा दिवस ते महिन्याचा अवधीत जाहीर होणार अंतिम निकाल यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने अवघ्या दोन दिवसात जाहीर केला   गेल्या काही वर्षांपासून कमीत कमी अधिकारी निवडण्याचा प्रघात केंद्रीय लोकसेवा आयोगाने याही वर्षी सुरूच ठेवला या वर्षी फक्त 762 अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली   मागील 2019 वर्षी 796 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.. सन 2015साली .1129,    ,2016 साली   1079, 2017साली 980   , 2018   साली 792 , 2018 साली 896 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.   पुर्वी दरवर्षी जितके अधिकारी सेवानिवृत्त होत तितकेच आता होत आहेत, मात्र सातत्याने नविन अधिकाऱ्यांची भरतीसंख्या कमी होतानाच दिसते .गेल्या सहा वर्षीचा आढावा घेतल्यास 20...

स्पर्धा परीक्षेच्या नावाने (भाग2)

इमेज
       माझ्या कालच्या स्पर्धा परीक्षेच्या लेखावर प्रतिक्रिया देताना काही जणांनी या परीक्षार्थींवर ज्या गोष्टीने ताण येतो, ते म्हणजे पुणे सारख्या ठिकाणी राहणे खरेच गरजेचे असते का ? याबाबत विचारणा केली, तर त्या प्रश्नांविषयी सांगण्यासाठी ही पोस्ट.                 या परीक्षार्थींना पुण्यात राहणे खरेच आवश्यक असते का? याचे एका शद्बात किंवा वाक्यात उत्तर देणे अशक्य आहे. यासाठी या परीक्षांसाठी कोणत्या प्रकारच्या अभ्यासाची पद्धत आवश्यक असते. हे माहिती करुन घेणे आवश्यक असते.  या परीक्षेचा अभ्यासक्रम खुपच विस्तृत असतो,  त्यामुळे याचा अभ्यास करताना कदाचित अवांतर गोष्टींंचांच अभ्यास केला जावू शकतो. जसे  मराठी, इंग्रजी  सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्रजी वाचन करताना  जी पुस्तके वाचून काहीच मराठी, इंग्रजी सुधारणार नाही, असी पुस्तके , दैनिके वाचणे वगैरे.या परीक्षांचा अभ्यास विस्तृत असला तरी एका विशिष्ट दिशेने करावा लागतो. मार्ग चूकला तर खुप अभ्यास करुनही काहीच उपयोग नाही. तसेच या प्रकारच्या अभ्यासात सातत्याने परीक्षण आव...

स्पर्धा परीक्षेच्या नावाने .....

इमेज
      मुख्य परीक्षा होवून दोन वर्षे झाली तरी, परीक्षेचा अंतीम टप्पा असलेल्या मुलाखतीचा टप्पा होत नाही, यामुळे निराश होत रविवारी पुण्यात भावी अधिकारी होवू शकणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315आणि316 मध्ये राज्य प्रशासन सेवेतील उपजिल्हाधिकारी पर्यतचे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना राज्य सरकारकडून करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाची परीक्षा सदर तरुण देवू इच्छित होता.या आत्महत्येने यापुर्वी अनेकदा चर्चिले गेलेले मुद्दे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.        घटनेत स्पष्ट उल्लेख असून देखील आयोगाची कार्यक्षमता फारशी उत्तम नसणे. वेळोवेळी प्रश्नपत्रीकेत काही चुका असणे. परीक्षा वेळेवर न घेणे,निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे न देणे आदी गोष्टी आयोग आणि शासनाकडून फार पुर्वीपासून होत आहे. सध्याच्या कोरोनाकाळात यात थोडी वाढ झाली इतकेच. यामुळे खेडोगावातील सर्वसामान्य गोरगरीब भरडला जातो..आज जाहिरात निघेल उद्या जाहिरात निघेल या आशेवर...

एमपीएसीच्या नावाने

इमेज
आज मी तुमच्याशी बोलत असताना राज्यांभरात एमपीएससी च्या परीक्षा राडा झाल्याने परीक्षार्थींच्या अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे . कदाचित तुम्ही हा मजकूर वाचत असताना त्यांच्यावर राज्य प्रशासनाने तोडगा काढला असेलही . मित्रानो प्रशासनातील अधिकरी कर्मचारीवृंद निवडण्यासाठी  आपल्या राज्यघटनेच्या  कलम 316आणि 317 नुसार महाराष्ट्रासाठी तयार केलेला हा घटनादत्त अयोग म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा अयोग .  या आयोगामार्फत राज्यसेवेतील पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील अधिकारी निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला तब्ब्ल पाचव्यांदा पुढे ढकलल्यामुळे परीक्षेचे उमेदवार जे पुढे प्रशासनातील महत्त्वाच्या पदावर आरूढ होणार आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत . मी दोन कालावधीत मिळून  एकूण  पाच वर्षे पुण्यातील सदाशिव पेठे ,नवी पेठ , नारायण पेठ या भागात वास्तव्यास होतो . या भागात विविध स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अक्षरशः पोटाला चिमटा काढत पडेल तसे कामे करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात . अभ्यासिकेत जागा मिळवण्यासाठी अभ्यासिका चालकांची मुजोरी सांभाळत घरून येणाऱ्या पैशावर किंवा स्वतःच्या अन्य स्रो...

स्पर्धा परीक्षेतील घोटाळा माध्यमात आलेला ( भाग 2)

इमेज
              सध्या आपल्या भारतात पारंपरिक माध्यमे नववर्षाच्या बातम्या देण्यात मग्न असताना,   मात्र राजस्थानातील हजारो युवक युवतींचा जीव टांगणीला लागलाय, आणि याला कारणीभूत ठरलाय,  तो राजस्थान लोकसेवा आयोगाच्या निष्काळजीपणा  . ज्या परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत मे 2018ला संपते . त्या परीक्षेचा पहिला टप्पा पार पडतो तो तब्ब्ल दीड वर्षाने अर्थात 30 डिसेंबर 2019ला . बर पहिला टप्पा तरी शांततेत पार पडतो का ? याचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते . परीक्षा सुरु होण्याच्या दोन तास त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका फुटते . परिणामी ती परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की राजस्थान लोकसेवा आयोगावर येते .परीक्षा नंतर घेण्यात येईल असे मोघम उत्तर प्रशासनकडून देण्यात येते . मात्र पुनर्परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात येत नाही .काय म्हणावे यास ? मागे 'गुजरात लोकसेवा आयोगाच्या' "बिन सचिवालय" या परीक्षेत सुद्धा अशाच प्रकार  घडला होता . (त्यावेळी  लिहलेल्ल्या ब्लॉगची लिंक या ब्लॉग पोस्टच्या शेवटी देण्यात आली आहे . ) मात्र  प...

स्पर्धापरीक्षा घोटाळा माध्यमात न आलेला

इमेज
                                   सध्या समस्त भारत त्यातही भारताच्या पूर्व भाग नागरिकत्वाच्या विधयेयकामुळे आगीत होरपळून जात असताना , भारताचा पश्चिम भागही वेगळ्या एका कारणांमुळे तरुणाईचा रोषाला बळी पडत आहे . पश्चिम भागातील तरुणाईचा रोषाला कारणीभूत आहे , एका राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या एका परीक्षेत झालेला अभूतपूर्व गोंधळ, ज्यामुळे ती परीक्षाच अखेर रद्द करण्याची वेळ त्या राज्य लोकसेवा आयोगावर आलेली आहे . या निमित्याने सर्वच राज्य लोकसेवा आयोगाचा  कार्यपद्धतीचा एकंदरीत आढावा घेतला असता येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही असे खेदाने म्हणावे लागेल .                    मित्रानो , भारतीय संविधानाच्या कलम 317 मध्ये या राज्य लोकसेवा आयोग प्रणालीचा  स्पष्ट उल्लेख करण्यात आला असताना , त्यांची दुर्दशा होणे वाईट आहे . वेळेवर परीक्षा न होणे , परीक्षेचा निकाल वेळेवर न लागणे , लोकसेवा आयोगाकडून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना सरकारकडून नि...