पोस्ट्स

मार्च ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची गरुडझेप

इमेज
               शुक्रवारी भारतीय रेल्वेने एक फार  मोठी गरुडझेप गाठली .  विस्ताराबाबत जगातील चौथ्या क्रमांकाची  आणि कर्मचाऱ्यांबाबत जगातील पहिल्या क्रमांकाचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या,  आपल्या भारतीय रेल्वचा  कलंक असलेल्या, अपघाताला सोडचिठ्ठी  देण्याचा,  प्रयत्न गेल्या काही  वर्षांपासून केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्या अंतर्गत एकाच रेल्वेरुळावर समोरासमोर येणाऱ्या, रेल्वे इंजिनाची टक्कर होवून अपघात होवू नये, यासाठी कवच या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या, रेल्वे प्रणालीची शुक्रवारी  यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता रेल्वेच्या   रेल्वेमार्गावर ही प्रणाली बसवण्यात येईल. अनेक देशांंमध्ये या सारखी प्रणाली या आधीच कार्यान्वित असली तरी, त्यासाठी प्रतीकिमी 2कोटी रुपये खर्च होतो.तर भारतीय रेल्वेत आगामी काळात वापरली जाणाऱ्या कवच या प्रणालीस या खर्च्याचा 25% म्हणजेच फक्त 50लाख रुपये खर्च होणार आहे. म्हणजेच पाश्चात्य देशात एक किमीसाठी लागणाऱ्या खर्चात भारतात चार किमीसाठी ही सुरक्षा प्रणाली वापरली जावू शकते. चालू आर्थिक वर्षात 2000किमी रेल्वेमार्गावर ही प्रणाली बसवण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. या 200