पोस्ट्स

नोव्हेंबर १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताला लोकशाहीप्रधान करणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी

इमेज
       भारताला  लोकशाहीप्रधान करणाऱ्या  पंतप्रधान इंदिरा गांधी ? चमकलात ना ! ज्या इंदिरा गांधी यांनी देशात स्वहितासाठी आणीबाणी जाहीर करून देशातील लोकशाही संपवणाऱ्या पंतप्रधान म्हणून  देश ओळखतो त्यांना भारताला  लोकशाहीप्रधान करणाऱ्या  पंतप्रधान इंदिरा गांधी कसे काय म्हणता येऊ शकते ? असा आपणास प्रश्न पडू शकतो , तर त्या लोकांना मी सांगू  इच्छितो की , देशातील संस्थानिकांचे तनखे रद्द करत भारताला खऱ्या अर्थाने लोकशाहीप्रधान केले ते  इंदिरा गांधीनी  हे नाकारण्यात काही अर्थ नाही .  कोणत्याही प्रजासत्ताक लोकशाहीप्रधान  देशात जनता स्वर्वभौम असते.  कोणताही राजा त्या देशात विशेष सवलती घेऊ शकत नाही हा संदेश देत त्यांनी भारताला खऱ्या अर्थाने लोकशाहीप्रधान देश केला . विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानातील काश्मीरविषयक ३७० वे कलम काढण्याचा निर्णय जेव्हढा धाडसी होता त्याच प्रकारचा धाडसी निर्णय म्हणून या कडे बघता येऊ शकते स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी संस्थानिकांनिकांशी केलेल्या करारानुसार पुढील ५० वर्षे जे तनखे त्यांना देण्यात येत होते ते त्यांनी सुमारे २५ वर्षातच रद्द केले तनखे रद्द केल्यामुळ